रायगडमध्ये शिंदेसेना-काँग्रेस एकत्र, म्हसळा नगरपंचायतीवर झेंडा फडकताच सुनील तटकरेंचा फोटो हटव

रायगड : रायगडमध्ये शिवसेना काँग्रेस आघाडी रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवर अखेर  शिवसेनेचा भगवा फडकला आहे. म्हसळा नगरपंचायतीवर (Mhasla Nagarpanchayat) आज नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली यामध्ये 17 पैकी 9 जागांवर शिवसेनेला (Shivsena) बहुमत मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीची या निवडणुकीत पीछेहट झाल्यामुळे सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. गेल्या दहा वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती. मात्र, या सत्तेला मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) त्यांनी सुरुंग लावत सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून जंजिरकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे हे रिंगणात होते. (Maharashtra Politics news)

आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीत देखील श्रीवर्धन (Shrivardhan) मतदार संघात शिंदे शिवसेनेची ताकद अधिकच वाढत असल्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना  असा संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे. या विजयाच्या निमित्ताने राष्ट्रवादीला शिंदे शिवसेनेकडून धोबीपछाड मिळाला आहे. म्हसळा नगरपंचायत परिसरात आज लागलेल्या निकालानंतर  शिंदे शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला.

Raigad News: सत्ता स्थापन होताच नगराध्यक्षांच्या केबिनमधील सुनिल तटकरे यांचा फोटो हटवला

म्हसळा नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तांतरानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या केबिनमधील खासदार सुनिल तटकरे यांचा फोटो हटवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर A R अंतुले यांचे फोटो लावले.  म्हसळा नगर पंचायतीमधील हा पराभव अदिती तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्हीप मोडणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई करु, असा इशाराही दिला होता.

आणखी वाचा

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाची पदं भरणार; महिला आयोग, प्रदेशाध्यक्षपदासाठी सहा नावं चर्चेत

आणखी वाचा

Comments are closed.