रायगड जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडीत शिवसेनेला झुकतं माप, वाद नसल्याचा गोगावलेंचा खुलासा

रायगड जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना : रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. या लढतीत शिवसेनेला 21, राष्ट्रवादीला 16 आणि भाजपने 15 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भाजपने तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीने आपल्याकडे घेत शिवसेनेची कोंडी केली होती. मात्र सभापती पदांच्या निवडणुकीत आज शिवसेनेला झुकता माप देऊन वरीष्ठांनी समतोल राखण्याच काम केलं आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतीपदांच्या निवडीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादी तसेच भाजपला प्रत्येक एक सभापती पद

शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादी तसेच भाजपला प्रत्येक एक सभापती पद यावेळी देण्यात आलं आहे. याप्रसंगी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापतींचे मान्यवरांकडून स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमच्यात कधीच वाद नसल्याचा खुलासा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.

रायगड जिल्हा परिषदच्या 59 जागांसाठी निवडणुक पार पडली होती

रायगड जिल्हा परिषदच्या 59 जागांसाठी निवडणुक पार पडली होती. शिवसेना शिंदे गटाचे 21, राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, भाजपचे 15, शिवसेना ठाकरे गटाचे 5, तर काँग्रेसचे 2 सदस्य निवडून आले होते. स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल असे पुर्ण बहुमत कुठल्याही पक्षाला मिळाले नाही. त्यामुळे युती आघाडीची अपरिहार्यता निर्माण झाली. त्यामुळे निकाल लागताच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सोबत जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करणार असल्याचे जाहीर करून टाकले होते, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ दोन्ही पक्षांकडे असल्याने तिसऱ्या पक्षाला सोबत घेण्याची गरज उरली नव्हती. त्यामुळं रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भाजपने तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीने आपल्याकडे घेत शिवसेनेची कोंडी केली होती.

सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून शिवसेनेला दूर राहावे लागले

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली होती. स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते चर्चा करण्यास तयार नव्हते. दोन्ही पक्ष सदस्यांना घेऊन गोव्यात जाऊन बसले होते. त्यामुळे चर्चा कोणाशी आणि कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून शिवसेनेला दूर राहावे लागले.

आणखी वाचा

Comments are closed.