लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून ‘हे’ अॅप बंद होणार
रेल्वे UTS ॲप: लोकल ट्रेन सेवा ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. उपनगरीय लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अलीकडच्या ऑनलाईन पेमेंटच्या जमान्यात मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणारे अनेकजण मोबाईलवरुन तिकीट काढण्यासाठी रेल्वेच्या यूटीएस अॅपचा (Railway UTS APP) वापर सर्रास करायचे. या अॅपवरुन प्रवाशांना रेल्वेचा मासिक पासही काढता यायचा. मात्र, येत्या 1 मार्चपासून UTS APP कायमचे बंद होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेकडून UTS APP टप्याटप्प्याने बंद केले जाणार आहे. UTS APP ची जागा आता रेल वन अॅप ( Rail One App) घेणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांनी पर्याय म्हणून रेल वन अॅपचा वापर सुरु करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. (Mumbai News)
यूटीएस अॅपवरून रेल्वे पास, पासचे नूतनीकरण आणि नवीन नोंदणीची सुविधा थांबवण्यात आली आहे. तसेच 4 फेब्रुवारीपासून प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग आणि आर-वॉलेट रिचार्ज करण्याची सुविधा निष्क्रिय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट सेवा अखंडितपणे वापरण्यासाठी लवकरात लवकर ‘रेल वन’ अॅप इन्स्टॉल करावे आणि त्याचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. अनेक प्रवाशांचे रेल्वे पास युटीएस अॅपवर आहेत. त्यांची वैधता 1 मार्चनंतरची असल्यास ते ‘रेल वन’ अॅपवर ट्रान्सफर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
आणखी वाचा
चुकीच्या खात्यावर UPI पेमेंट केलात तर पैसे परत मिळतात का? ‘या’पेक्षा जास्त वेळ केलात तर मोठं नुकसान
किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदलाची शक्यता, शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
आणखी वाचा
Comments are closed.