राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची मिठी; बाळा नांदगावकरांचा व्हिडीओ व्हायरल, स्टेजवर काय केलं?

राज थॅकरी उधव ठाकरे मंबाब: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती, तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. स्टेजवर दाखल होताच  राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं. याचदरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द बाळा नांदगावकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. 2017 साली बाळा नांदगावकर माझा कट्ट्यावर आले होते. त्यावेळी ते बाळासाहेबांसोबत झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगत भावुक झाले होते. आपण बाळासाहेबांना शब्द दिला होता. त्यामुळेच या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय. दोन बंधू एकत्र आल्यानंतर माझं राजकारण संपलं तरी चालेल पण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी या दोघांनी एकत्र यायला हवं, असं बाळा नांदगावकर बोलताना दिसले. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर स्टेजच्या मागच्या बाजूला बाळा नांदगावकर उभे होते. ठाकरे बंधूंनी मिठी मारताच बाळा नांदगावकरांना खूप आनंद झाला. बाळा नांदगावकर यावेळी खूप भावूक झाल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे.


बाळा नांदगावकरांना बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते?

बाळासाहेब ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी आपली आठवण काढली होती. पक्ष वेगळा असतानाही, आपण राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतरही बाळासाहेबांनी आपली आठवण काढली हे माझ्यासाठी भाग्याचं होतं. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. आमची 12 मिनिटे चर्चा झाली. शेवटी जाताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, बाळा… राज आणि उद्धव एकत्र आले तर बरे होईल, अशी आठवण बाळा नांदगावकरांनी सांगितली.

राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=3grx3hitwna

संबंधित बातमी:

Raj Thackeray Uddhav Thackeray Video: राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी हात मिळवला, पाठ थोपटली; स्टेजवर नेमकं काय घडलं?, VIDEO

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो

आणखी वाचा

Comments are closed.