छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता, कशाला टाईमपास करतोय; राज ठाकरेंच्या मुळशी पॅटर्न फ
राज ठाकरे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यात घेतलेल्या शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कठोर आणि स्पष्ट भाषेत पक्षातील शिस्त व कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. शहरातील संकल्प हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीला पुण्यातील सर्व शाखा अध्यक्ष, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांना त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून फटकारले.
रमेश परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. संघाचा कट्टर कार्यकर्ता असा फोटो राज ठाकरेंनी बघितल्याने त्यांनी परदेशी याला कार्यकर्त्यांच्या समोर झापलं. “छाती ठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे, कशाला टाईमपास करतो, एकाच ठिकाणी कुठे तरी राहा,” असे म्हणत राज ठाकरेंनी मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांना चांगलेच सुनावले.
Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पद सोडा; राज ठाकरे यांचा इशारा
यानंतर राज ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामगिरीबाबत प्रश्न विचारले. “इतके दिवस काय काम केले? मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत?” असे विचारत त्यांनी कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले. अनेक पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की, “काम करायचं नसेल तर पद सोडा. जबाबदारी न निभावणाऱ्यांना पक्षात ठेवण्याची गरज नाही. अशांना थेट काढून टाका,” असे इशारा त्यांनी यावेळी दिला. राज ठाकरेंच्या या शब्दांनंतर काही शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी शांत राहिले, काहींनी माना खाली घातल्याचे पाहायला मिळाले.
Raj Thackeray: राज ठाकरे बैठक संपवून निघून गेले
दरम्यान, शाखाध्यक्षांची बैठक ही किमान एक ते दोन तास चालणं अपेक्षित होतं. यावेळी पुणे शहरातील विविध प्रश्न त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या बाबत असलेली रणनीती तसेच मतदार यादी यांच्यातील गोंधळ याबाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन हे या बैठकीचा मूळ उद्देश होता. मात्र शहरातील नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून निराशाजनक उत्तर मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी ही बैठक संपवून निघून जाणं पसंत केल्याचे दिसून आले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.