दोस्तीतून बिल्डरांच्या शहरांची वाट लागली, राज ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आपल्याकडे वाहतूक व्यवस्थेला कोणताही आकार आणि उकार नाही. फक्त पूल, फ्लायओव्हर बांधले जात आहेत. रस्ते असे तयार केले जातात की पुन्हा दोन वर्षांत कामे निघाली पाहिजेत. डेव्हलपमेंट प्लॅन हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार नाही तर बिल्डरांच्या दोस्तीतून तयार केला जात आहे. कोणाला कोणती जमीन घ्यायची आणि कुठे विकास करायचा याचाच फक्त विचार होत आहे. त्यामुळे टाऊन प्लॅनिंगची वाट लागली असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

वाशी येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या राज ठाकरे यांनी वाहतूक नियोजनाची चिरफाड केली. शहराच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत १५ टक्के रस्ते असणे आवश्यक आहे. मात्र पुणे शहरात फक्त ७ टक्के क्षेत्रफळावर रस्ते आहेत. रोज मोठ्या संख्येने गाड्या रस्त्यावर उतरत आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. इमारतींवरही नियंत्रण राहिलेले नाही. जमिनी बळकावून आणि तलाव बुजवून इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे शहरांना आकार राहिलेला नसल्याने टाऊन प्लॅनिंग आणि वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Comments are closed.