पंचताराकित हाॅटेलपासून, वर्षा बंगला ते शिवतीर्थापर्यंत; वर्षभरात राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना
मुंबई: आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. नागरिकांच्या विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) पोहचले. मात्र काल (बुधवारी, ता 20) बेस्ट पतपेढी निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आणि आजच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. अशातच गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची अनेकदा भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. 2025 मध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चार वेळा भेट झाली आहे.
२१ ऑगस्ट- वर्षा निवासस्थानी राज ठाकरे
12- जून ताज जमीन आणि
१० फेब्रुवारी – शिवतीर्थ मुख्यमंत्री आले होते
७ मे – मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) ८ मेला ही बातमी समोर आली
२०२५ मध्ये राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना किमान तीन ते चार वेळेला भेटले आहे. त्यांच्या बैठकांचा थोडक्यात आढावा.
– आज २१ ऑगस्ट २०२५: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी, वर्षा बंगला येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीवेळी जवळपास पाऊण तास चर्चा झाली आहे.
– १२ जून २०२५: राज ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट सुमारे एक तास चालली.
– १० फेब्रुवारी २०२५: राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील दादर येथील त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे भेट घेतली. फडणवीसांच्या मते, ही भेट मैत्रीपूर्ण, वैयक्तिक भेट होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
या सगळ्या भेटींमध्ये ७ मे २०२५ ला राज ठाकरे सकाळी साडेसहाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीला गेले होते. ८ मेला ही बातमी समोर आली होती.
आजच्या भेटीवर काय म्हणाले राज ठाकरे?
गेले काही महिने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एक-दोन विषयांवर बोलत होतो. टाऊन प्लॅनिंगचा विषय घेऊन आज मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, असं राज ठाकरेंनी सांगितले. मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. पार्किंग आणि नो-पार्किंगबाबत फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले. आपल्याकडे जागांचा विचार केला तर कुंपणच शेत खात आहे. अर्बन नक्षल पेक्षा येथे शिस्त लावा. खोट्या रिक्षा आहे, टॅक्सी आहेत, त्यावर कुठलाही निर्बंध नाहीय, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
आणखी वाचा
Comments are closed.