मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा; ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिला गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे

Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava 2026 मुंबई: मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा (MNS Gudhi Padwa Melava 2026) आज पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून, पक्षाची आगामी भूमिका काय असेल, याबाबत कानमंत्र देतील. ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने, या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करणार? या मेळाव्यासाठी विशेष दोन स्क्रीन ही मैदानात लावल्या आहेत त्यामुळे त्यावर कोणाचा व्हिडिओ लावला जाणार? संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. राज ठाकरे या भाषणात नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल.

राज ठाकरे कोण भूमिका मांडणार? (राज ठाकरे मनसे गुढीपाडवा मेळावा 2026)

राज ठाकरे यांचा 2026 चा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडत असून, त्यासाठीची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे. आगामी राजकीय रणनीती आणि पक्षाची पुढची वाटचाल यावर या मेळाव्यात ते महत्त्वाची भूमिका मांडणार असल्याने सर्वांचे लक्ष या सभेवर लागले आहे. यापूर्वी झालेल्या पदाधिकारी बैठकीत रणनीतीवर चर्चा झाली होती, ज्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा होणार आहे.

संबंधित बातमी:

Raj Thackeray MNS Meeting: काल एकनाथ शिंदेंची भेट, आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक; राज ठाकरे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते!

आणखी वाचा

Comments are closed.