गाफील राहू नका, मुंबई गेली तर हे लोक थैमान घालतील, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल


राज ठाकरे : आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जर आपण गाफील राहिलो तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल असंही राज ठाकरे म्हणाले. एकदा मुंबई हातातून गेली तर आपल्याला कोणालाही काही जमणार नाही. हातातून मुंबई गेली तर हे लोक थैमान घालतील असे म्हणत नाव न घेता राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला. ते मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात बोलत होते.

रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे गाफील राहू नका मतदार याद्या तपासून पाहा

रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे गाफील राहू नका मतदार याद्या तपासून पाहा असेही राज ठाकरे म्हणाले. थोडे दिवस थांबा भाषण सुरुच होतील. 11 वर्ष हा कोकण महोत्सव साजरा होत आहे. मला फक्त जाता जाता एवढीच गोष्ट सांगायची आहे की, रात्र वैऱ्याची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्या ज्या काही सुरू आहेत त्यावरती लक्ष ठेवा. मतदार खरी आहे खोटे आहे याच्यावरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल असंही ते म्हणाले. जर आपण गाफील राहिलो तर हातातून गेली समजा असेही राज ठाकरे म्हणाले. थोडे दिवस थांबा भाषण सुरुच होतील असेही राज ठाकरे म्हणाले.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर लगेचच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान विरोधकांकडून सातत्यानं निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताध्याऱ्यांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबईमध्ये आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्यांमध्ये जे काही सुरू आहे, त्यावर लक्ष ठेवा असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

मंत्री बाबासाहेब पाटलांनी गद्दारी केली, त्यांना धडा शिकवणार, संभाजी पाटील निलंगेकरांचा हल्लाबोल, लातूरमध्ये युतीत बिघाडी

आणखी वाचा

Comments are closed.