बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाला भोपळा; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, छोट
सर्वोत्तम निवडणुकीच्या निकालावरील राज ठाकरे मुंबई: सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल (Best Election Result) समोर आला. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा पुरता धुव्वा उडाला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. ठाकरे बंधूंच्या या पराभवानंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.
21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले. यंदाच्या बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. या पराभवावर राज ठाकरेंना माध्यमांशी आज विचारले असता, त्या छोट्या निवडणुका आहेत. या लहान गोष्टी आहेत. कुठल्या निवडणुकांबद्दल तुम्ही बोलता? मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही…त्या स्थानिक निवडणुका आहेत…तुम्हाला रोज आग लावायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या उमेदवारांचा पराभव-
बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय. दादर सेनाभवन परिसरात भाजपने जोरदार बॅनरबाजी केलीय. ठाकरे ब्रँड कोमात स्वदेशी देवाभाऊ जोमात, असं या फलकावर नमूद करण्यात आलंय. नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा सपशेल पराभव झाला होता. सर्वच्या सर्व 21 जागांवर ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलला 7 जागा मिळाल्या होत्या. तर शशांक राव यांच्या पॅनेलला 14 जागा मिळाल्या.
राज ठाकरेंनी आज देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट-
राज ठाकरेंनी आज देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी 50 मिनिटं खलबतं झाली. मुंबईतील वाहतुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत दिली. मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले, असं राज ठाकरेंनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=L92ESZ3YI2A
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.