रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
मराठी सक्तीच्या ऑटो टॅक्सीवर राज ठाकरे: रिक्षा आणि टॅक्सी (Taxi-Auto) चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य (Marathi Language) करण्याचा निर्णय लागू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र अनेक संघटनांनी विरोध करत मराठी भाषा शिवकण्यासाठी थोडा वेळ देण्याची मागणी केली. यानंतर प्रताप सरनाईक यांनी आता 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत चाकलांना मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालवतो का ते पाहिले जाणार आहे. जे यात दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र मराठी भाषेबाबत 15 ऑगस्टपर्यंत आकारणार नाही, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले.
रिक्षा आणि टॅक्सी (Taxi-Auto) चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य निर्णयाच्या या भूमिकेवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात काल वरूणराज भिडे स्मृती पुरस्कार राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या मराठी शिकवण्यावर भाष्य केलं. जिथली माती भुसभुशीत असते तिथे घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र येऊन खडकासारखं कडक उभं राहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. (Raj Thackeray On Marathi Compulsory Auto Taxi)
राज ठाकरे काय म्हणाले? (Raj Thackeray On Marathi Compulsory Auto Taxi)
राज ठाकरे मराठी भाषेबद्दल बोलतो ते लोकांसाठी बोलतो. पश्चातापाचा हाथ मारून काही फायदा नाही. सध्या भैया यांना मराठी शिकवायचं चालले आहे. भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील. त्यांची राज्य सुधारली नाहीत याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे प्रश्न कुणी विचारत नाही. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार. प्रत्येक वेळा महाराष्ट्रात येऊनच तुम्हाला धमकी दिली जाणार. त्यावर आमचे राज्यकर्ते हात चोळत बसणार. कोणाच्या दबवाखाली? सगळेजण बॅकफूटवर का खेळतात? ते मला कळलेलं नाही. दुसऱ्या राज्यांमध्ये असं कुणाची बोलायची हिंमत आहे का? पण त्यांच्यावर त्याप्रकारचा दबावच नाही, असं राज ठाकरे म्हणले. जिथे जमीन भुसभुशीत असतात तिथेच घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत, असं म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.