दुबे मुंबईला येतील, समुद्रात मारतील; राज थाक्रान्चन भाजप खस्दारला प्रतिसाद
राज ठाकरे यांना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना उत्तर द्या:“दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु.. त्याच्यावर केस झाली का ओ? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का? त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटके मारणार? दुबेला मी सांगतो .. दुबे ..तुम मुंबई में आ जावो.. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे (निशिकांत दुबे) यांना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे (राज ठाकरे) यांनी मराठी माणसांना संबोधित करण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
https://www.youtube.com/watch?v=OBHRX41MFSY
राज ठाकरे म्हणाले, तुमची भाषा आणि तुमची जमीन गेली तर तुम्हाला अर्थ नाही, कोणी विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणे गरजेचे आहे, हे फक्त महाराष्ट्रात काही गोष्ट झाली तर हिंदी चॅनेलवाले देशात चालू ठेवतात, ही सत्ताधाऱ्यांची ढेकणं आहेत. थोड्या वेळाने सुरू होतील, राज ठाकरे विष ओकल म्हणून….हे हिंदी चॅनेलवाले जाणून बुजून हा विषय घेतात. बिहारमध्ये आजही 99 टक्के मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाहीत. हनुमान चालीसा अवधीमध्ये आहे, हिंदी नाही. मराठी भाषेचा इतिहास आपण समजून घ्यायला हवा. माझे तर सगळ्या भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत, त्यापेक्षा माझे हिंदी चांगली आहे,. याचे कारण माझे वडील… माझ्या वडिलांना उत्तम मराठी हिंदी, उर्दू येत होते. भाषा कधीच वाईट नसते पण आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार.. लहान मुलांवर तर लादू देणारच नाही..
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, हिंदुत्वाच्या बुरखा खालून तुम्ही मराठी संपवणार असाल तर माझ्यासारखा मराठी तुम्हाला सापडणार नाही. मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत सर्व मतदार संघ त्यांना अमराठी करायचे आहेत. ही नुसती माणसे येत नाही, हे मतदार संघ बनावट आहेत. उद्या सांगणार आमचा खासदार आमदार महापौर, असे करत हा सगळा पट्टा गुजरातला लावायचा प्रयत्न सुरू आहे. हे षडयंत्र समजून घ्या, सहज आलेला माज नाही हा, हा माज तिथून आला आहे. शिवरायांची घोषणा काय होती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हिंदी प्रांत वर आमची सत्ता हवी, इथे हिंदी लोकांनी येथून सत्ता स्थापन नाही करायची.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.