हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
जंतरमंतरवर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवरती, तरुणांवरती तसेच युवतींवरतीसुद्धा ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांकडून अत्याचार करण्यात आले, अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली, इतकेच नव्हे तर तरुणींची कपडेसुद्धा फाडण्यात आली, या सर्व प्रकारानंतर देशामध्ये संतापाचा उद्रेक झाला असतानाच आता आणखी एक पोलिसांच्या कारनाम्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईमधील असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओत आंदोलनात सामील झाल्यास पोलिस ड्रग्जची पावडर खिशात टाकण्याची धमकी देत आहे.
तर खिशामध्ये 50 ग्रॅम पावडर टाकीन
राजधानी दिल्लीमध्ये जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन होत असतानाच आता देशभरामध्ये आंदोलनाचं लोण पसरलं आहे. तर अशाच पद्धतीने मुंबईमध्ये आंदोलन होत असताना दोन तरुण विद्यार्थ्यांना पोलिसांनी गाडीमध्ये कोंबल्यानंतर त्यांना या एरियामध्ये पुन्हा दिसल्यास तर खिशामध्ये 50 ग्रॅम पावडर टाकीन, आयुष्यभरासाठी जाशील असा धमकावणारा व्हिडिओच आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
पोलीस ड्रग सप्लायर आहे का?
राज ठाकरे यांनी अत्यंत खोचक शब्दांमध्ये या व्हायरल व्हिडिओवरून पोलिसांना विचारणा केली. म्हणजे आता पोलीससुद्धा पावडरवाले झाले आहेत का? अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. या एरियात जर दिसलास तर खिशामध्ये तुमच्या 5 ग्रॅमची काय 50 ग्रॅमची पावडर टाकीन, म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. पोलीस ड्रग सप्लायर आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
ड्रगचा वापर करण्याची भाषा वापरत असतील तर
या व्हायरल व्हिडिओची राज ठाकरे यांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या दखल घेतली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मुंबईत आपल्या न्याय मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. लाठीहल्ल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओमध्ये तुमच्या खिशात ड्रगच्या पुड्या ठेवून तुरुंगात टाकीन अशी उघड धमकी मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी आंदोलक तरुणांना दिसत आहे. हे कृत्य अतिशय विकृत, तितकेच निषेधार्ह आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारे आहे. ज्या मुंबई पोलिसांवर अंमली पदार्थांचा व्यापार मुळापासून उपटण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, तेच पोलीस विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी ड्रगचा वापर करण्याची भाषा वापरत असतील तर हे अत्यंत गंभीर असल्याचं” त्यांनी म्हटलं आहे.”
इतर महत्वाच्या बातम्या
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Comments are closed.