सर्व CCTV तपासा, 24 तासांत शोधा…; राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ, पोलिसांना काय म्हणाले?
मीनाटाई ठाकरे पुतळा वर राज ठाकरे मुंबई: स्वर्गीय मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला. दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्यापाशी ही घटना घडली आहे. काल (16 सप्टेंबर) रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, सदर घटना घडल्यानंतर आज (17 सप्टेंबर) दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास्थळी जाऊन माहिती घेतली.
राज ठाकरे ज्यावेळी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आले, तेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील उपस्थित होते. राज ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ जाऊन सदर घटनेची माहिती घेतली. तसेच पुतळ्याच्या जागेची पाहणी केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून देखील राज ठाकरेंनी संबंधित घटनेची माहिती घेतली. सीसीटीव्ही चालू आहेत का?, असा राज ठाकरेंनी पोलिसांना प्रश्न विचारला. तसेच सगळे सीसीटीव्ही चेक करा, 24 तासांमध्ये आरोपींना शोधून काढा, असं राज ठाकरे पोलिसांना म्हणाले. दरम्यान, पोलिसांकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उद्धव ठाकरेही मीनाताईंच्या पुतळ्याजवळ पोहोचणार-
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आधीच आपल्या नेत्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचं 1995 साली निधन झालं होतं. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता.
नेमकं काय घडलं? (What Happened Near Meenatai Statue)
दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ कोणीतरी सकाळच्या सुमारास लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला आहे घटनास्थळी शिवसैनिक जमले आहेत. काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूची साफसफाई करताना दिसून येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणच्या स्थानिक आमदार, खासदार, काही शिवसैनिक परिसरात दाखल झाले. जमलेल्या शिवसैनिकांनी साफसफाई सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. आजूबाजूचा लाल रंग शिवसैनिकांनी पुसून काढला आहे. शिवसैनिकाने आजूबाजूचा लाल रंग पुसत साफसफाई केली.
https://www.youtube.com/watch?v=KDC8U_FQJSS
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.