राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या त

राज ठाकरे उद्धव ठाकरे युती: मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुंबई महानगरपालिकेसाठी एबी फॉर्मचे वाटप सुरु केले आहे. मुंबईत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला. स्वत: राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांना एबी फॉर्म दिला. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर देखील उपस्थित होते. (Shivsena UBT-MNS Yuti)

वॉर्ड क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार उमेदवारी दाखल करणार आहेत. राज ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळताच यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) भावूक झाले. माझ्यासाठी भावनिक आणि आनंद गोष्ट आहे. भावनिक झालो आहे, कंठ दाटून आला आहे, असं यशवंत किल्लेदारांनी सांगितले. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोचपावती मिळाली, असंही यशवंत किल्लेदार म्हणाले. दरम्यान, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमध्ये वॉर्ड क्रमांक 192 ची जागा मनसेला सुटल्याने ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार प्रकाश पाटणकर नाराज झाले होते. त्यानंतर आज मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रकाश पाटणकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमध्ये बंडखोरीचा प्रचंड फटका बसण्याची शक्यता आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार-

राज आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे भावांनी 24 डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता ‘ठाकरे बंधू विरुद्ध महायुती’ असा थेट सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) एकत्र लढणार आहे.  त्यामुळं या निवडणुकीत बहुमताचा म्हणजेच 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. (BMC Election 2026)

संबंधित बातमी:

BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट, शिंदे गट, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीपर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!

MNS Candidate List BMC Election 2026: मुंबईत मनसेचा पहिला उमेदवार, राज ठाकरेंनी स्वत: AB फॉर्म दिला, उमेदवाराचा कंठ दाटला!

आणखी वाचा

Comments are closed.