CWG 2026 वेटलिफ्टर राजा मुथुपंडीला रौप्य पदक; पदार्पणातच मारली बाजी
हिंदुस्थानचा वेटलिफ्टर राजा मुथुपंडी याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच चमकदार कामगिरी करत पुरुषांच्या ६५ किलो वजनगटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. या कामगिरीसह हिंदुस्थानने रविवारी पार पडलेल्या वेटलिफ्टिंगच्या तिन्ही प्रकारांमध्ये किमान एक पदक जिंकण्याचा आपला धडाका कायम ठेवला. त्याच्या या यशामुळे हिंदुस्थानची एकूण पदकसंख्या आता चार झाली आहे.
राजा मुथुपंडीने स्नॅचमध्ये 126 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलून एकूण 286 किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले.
सुवर्ण पदक: मलेशियाच्या मोहम्मद अझनिल बिन बिदीन याने एकूण २९९ किलो वजन उचलत नवीन राष्ट्रकुल विक्रम नोंदवला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
कांस्य पदक: पापुआ न्यू गिनीच्या मोरेआ बारू याने एकूण २८२ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले.
मीराबाई चानूने पटकावले सुवर्णपदक
हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो गटात एकूण १९० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेतील तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक असून, हिंदुस्थानच्या खात्यातील या स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण ठरले.
Comments are closed.