7 मिनिटांची विक्रमी बोली अन् SOLD! 167 कोटींचा इतिहास रचला; राजा रवी वर्मांच्या यशोदा-कृष्ण’ पे
Raja Ravi Varma Yashoda Krishna painting:भारतीय कला विश्वात एक ऐतिहासिक विक्रम रचला गेला आहे. राजा रवि वर्मा (Raja Ravi Varma) यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या प्रसिद्ध पेंटिंगने आतापर्यंतची सर्वात महागडी भारतीय कलाकृती ठरण्याचा मान पटकावला आहे. ही पेंटिंग तब्बल 167.2 कोटी रुपयांना विकली गेली आहे. मुंबईत झालेल्या सफरोनर्टच्या लिलावात ही विक्री झाली. जवळपास सात मिनिटे जोरदार बोली लागल्यानंतर ही कलाकृती विक्रमी किमतीवर पोहोचली. याआधी सर्वात महागडी भारतीय पेंटिंगचा विक्रम एम. एफ. हुसेन यांच्या ‘ग्राम यात्रा’च्या नावावर होता, जी 118 कोटी रुपयांना विकली गेली होती.(MF Husain Record)
सायरस पूनावाला यांनी केली खरेदी
ही ऐतिहासिक पेंटिंग सायरस एस. पूनावाला यांनी खरेदी केली आहे. त्यांनी या कलाकृतीला केवळ वैयक्तिक संग्रह म्हणून न पाहता ‘राष्ट्रीय ठेवा’ असे संबोधले आहे. तसेच, ही पेंटिंग वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी प्रदर्शित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या खरेदीला भारतीय कला बाजारासाठी मोठी कामगिरी मानली जात आहे.
‘यशोदा आणि कृष्ण’ ही पेंटिंग 1890 च्या दशकातील असून भागवत पुराण मधील एका प्रसंगावर आधारित आहे. या चित्रात माता यशोदा आणि बालकृष्ण यांच्यातील भावनिक नात्याचा सुंदर क्षण टिपला आहे. प्रकाश आणि सावलीचा अप्रतिम वापर या पेंटिंगला विशेष बनवतो. कला तज्ज्ञांच्या मते, ही कलाकृती भारतीय कलेतील ‘मोनालिसा’सारखी मानली जाते.
भारतीय कला बाजाराला मोठा बूस्ट
या विक्रमी विक्रीमुळे भारतीय कला बाजाराला मोठी चालना मिळाल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे भारतीय कलेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल. तसेच, कला ही केवळ सौंदर्य नव्हे तर एक मजबूत गुंतवणूक म्हणूनही समोर येत आहे. भविष्यात अशा विक्रीमुळे कला बाजारात नवे विक्रम घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.