उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी…; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहि


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्या सत्तेला थेट आव्हान देत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उज्ज्वला थिटे राज्यभर चर्चेत आल्या आहेत. उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) आणि त्यांचा मुलगा जयवंत थिटे (Jaywant Thite) यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण पेटवले. दरम्यान, नगराध्यक्षपदावर झालेल्या बिनविरोध निवडीनंतर राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता पाटील (Prajakta Patil) यांनी उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांना उद्देशून प्रत्युत्तर दिले. “उज्ज्वला थिटे यांचे अनगर गावात मी स्वागत करेन,” अशी प्रतिक्रिया देत प्राजक्ता पाटील  (Prajakta Patil) यांनी दिली आहे.

Prajakta Patil: “उज्ज्वला थिटेंना गावातून कोणी जायला सांगितलं?”

माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या प्राजक्ता अजिंक्य पाटील यांची अनगर नगरपंचायतपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवड झाल्यानंतर प्राजक्ता पाटील यांनी विरोधी उमेदवारी म्हणून उभ्या राहिलेल्या उज्ज्वला थिटे यांच्याबाबत बोलताना म्हटलं की उज्ज्वला थिटे यांनी गावात यावं, त्यांचं स्वागत आहे. जल्लोष साजरा केल्यानंतर प्राजक्ता पाटील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, मी उज्ज्वला थिटे यांचं अनगर गावात स्वागत करेन. उज्ज्वला थिटे कधीपण गावात येऊ द्या, त्यांना अनगर गावातून कोणी जायला सांगितलं नाही, त्या मनाने गेल्या आहेत, अशी प्रतिक्रिया अनगर नगरपंचायतीच्या नवीन नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांनी म्हटलंय.

सरस्वती शिंदेंनी उमेदवारी मागे घेतल्याने अनगरमध्ये निवडणूक बिनविरोध

मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज भरण्यात आले होते. माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता पाटील भाजपकडून, अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उज्ज्वला थिटे निवडणुकीच्या या रिंगणातून उज्ज्वला थिटे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी सांयकाळी अवैध ठरवण्यात आला तर, सरस्वती शिंदे (अपक्ष उमेदवार) यांनी बुधवारी दुपारी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी प्राजक्ता अजिंक्य पाटील (भाजप) यांना बिनविरोध विजयी घोषित केले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.