मोठी बातमी! मित्तल कुटुंब, आदर पूनावाला यांनी राजस्थान रॉयल्स फ्रॅंचायजी 15,660 कोटी रुपयांना खरेदी केली

लक्ष्मी एन मित्तल, आदित्य मित्तल आणि आदर पूनावाला यांच्या संघाने आयपीएल फ्रॅंचायजी राजस्थान रॉयल्स (पार्ल रॉयल्स आणि बार्बाडोस रॉयल्सचाही समावेश) सुमारे १.६५ अब्ज (जवळपास १३७०० कोटी रुपये) डॉलर्सला विकत घेतली आहे. या संदर्भात लवकरत एक अधिकृत निवेदन जाहीर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरआरच्या फ्रॅंचायजीमध्ये मित्तल कुटुंबाचे ७५%, आदर पूनावालाचे १८% आणि उर्वरित ७% सध्याचे मालक मनोज बडाले यांच्याकडे आहेत. हा व्यवहार बीसीसीआय, सीसीआय, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि इतर संबंधित नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीसह पूर्ण केला गेला आहे. तसेच २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत त्याची पूर्तता होण्याची अपेक्षा आहे.

आर्सेलर मित्तलचे चेअरमन लक्ष्मी एन मित्तल, सीईओ आदित्य मित्तल, नॉन-इंडिपेंडेंट डायरेक्टर वनिषा मित्तल भाटिया, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला आणि मनोज बदाले हे राजस्थान रॉयल्सच्या संचालक मंडळात सामील होतील.

मित्तल यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला असल्याने त्यांचे या राज्याशी घनिष्ठ संबंध आहेत. याच कारणामुळे त्यांनी या फ्रॅंचायजीमध्ये रस दाखवला.

२१ मार्चला कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील एक समूह १.६३ अब्ज डॉलर्समध्ये फ्रॅंचायजी खरेदी करण्याच्या शर्यतीत होता आणि त्यासाठी त्यांनी एक विशेष करारही केला होता, मात्र आवश्यक निधी उभारण्यात अपयश, नियामक अनिश्चितता आणि आयपीएल फ्रॅंचायजीसाठी खरेदीदारांच्या समूहाच्या रचनेमुळे त्या प्रयत्नांना अपयश आले.

सोमानींच्या समूहात वॉलमार्ट परिवारातील अमेरिकन उद्योगपती रॉब वॉल्टन आणि एनएफएलच्या डेट्रॉइट लायन्स संघात बहुसंख्या हिस्सेदारी असलेल्या हॅम्प परिवाराचा समावेश होता.

सध्या आरआरची मालकी बदाले यांच्या इमर्जिंग व्हेंचर्सकडे आहे, ज्यांचा या फ्रॅंचायजीमध्ये ६५ टक्के हिस्सा आहे. तसेच अल्पसंख्य गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकन गुंतवणूक व्यवस्थापन फर्म रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्स (१५ टक्के हिस्सा) आणि फॉक्स कॉर्पोरेशनचे लॅकलॅन मर्डोक यांचा समावेश आहे.

Comments are closed.