विराट, रोहित OUT; आफ्रिदी, रिझवान IN…; बाबर आझमच्या वर्ल्ड-11मध्ये एकही भारतीय नाही, स्वतःलाह
बाबर आझम वर्ल्ड वनडे इलेव्हन: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या त्याच्या एका खास वर्ल्ड इलेव्हन निवडीमुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करताना बाबरने एकदिवसीय क्रिकेटमधील (ODI) सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली, मात्र यात त्याने एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिलेले नाही. विशेष म्हणजे, क्रिकेटमधील दिग्गज विराट कोहली, रोहित शर्मा आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनाही त्याने डावलले आहे.
भारतीय खेळाडूंना डावलल्याने क्रीडाविश्वात खळबळ
बाबर आझमने निवडलेल्या या संघात त्याने सलामीसाठी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांची निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारताचा रन मशीन विराट कोहलीऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामला स्थान दिले आहे. मध्यक्रमात त्याने मोहम्मद रिझवान, रचिन रवींद्र आणि हॅरी ब्रूक यांची निवड केली आहे.
भारतीय खेळाडूंना वगळण्यामागे निव्वळ पक्षपातीपणा असल्याची टीका सध्या सोशल मीडियावर होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एकदिवसीय क्रिकेटमधील महान खेळाडू मानले जातात, तरीही त्यांना संघात स्थान न मिळणे चाहत्यांच्या पचनी पडलेले नाही.
स्वतःलाच बनवले 12 वा खेळाडू
या संघ निवडीतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबरने या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्वतःला स्थान दिलेले नाही. त्याने स्वतःची निवड 12 वा खेळाडू’ (12th Man) म्हणून केली आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, हा बाबरचा नम्रपणा असू शकतो किंवा अलीकडच्या काळातील आंतरराष्ट्रीय फॉर्म आणि आयसीसी स्पर्धांमधील खराब कामगिरीमुळे आलेला कमी आत्मविश्वास असू शकतो.
गोलंदाजी फळीतही भारतीय गोलंदाजांचा अभाव
गोलंदाजी विभागातही बाबरने जसप्रीत बुमराहसारख्या भेदक गोलंदाजाला स्थान दिले नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांची निवड केली आहे. फिरकी गोलंदाजीसाठी त्याने मिचेल सँटनर आणि राशिद खान या जोडवर विश्वास दाखवला आहे.
बाबर आझमची वर्ल्ड एकदिवसीय इलेव्हन: (बाबर आझम वर्ल्ड एकदिवसीय इलेव्हन)
मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, मोहम्मद रिझवान, रचिन रवींद्र, हॅरी ब्रूक, मिचेल सँटनर, राशिद खान, जोफ्रा आर्चर, शाहीन आफ्रिदी, कगिसो रबाडा.
बारावा खेळाडू : बाबर आझम
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.