IPL 2026 – केकेआरची विजयी हॅट्रीक, गुणतालिकेतही घेतली झेप; हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव
IPL 2026 च्या 45 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 7 गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने 18.2 षटकांतच हैदराबादचा धुव्वा उडवला. या विजयासह केकेआरने गुणतालिकेत 8 व्या स्थानावर मजल मारली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली होती. अभिषेक शर्मा (15) स्वस्तात बादा झाला. परंतू त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत अवघ्या 22 चेंडूत 44 धावांची भागीदारी केली. हेडने 28 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी केली, तर इशान किशनने 42 धावांचे योगदान देत संघाला शतकी टप्पा ओलांडून दिला. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याने हैदराबादचा डाव 19 व्या षटकात 165 धावांवर आटोपला. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले, तर सुनील नारायणने आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
IPL 2026 – भाऊ हसत नाही पण फलंदाजांना रडवतो! सुनील नारायणच्या फिरकीचा ऐतिहासिक पराक्रम
हैदराबादने दिलेल्या 166 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला अजिंक्य रहाणे आणि फिन ऍलन यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. ऍलनने 13 चेंडूत 29 धावा कुटल्या, त्यानंतर कर्णधार रहाणे (43 धावा) आणि अंगकृष रघुवंशी (59 धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भक्कम भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. शेवटच्या टप्प्यात रिंकू सिंगने नाबाद 22 धावा करत संघाला विजयापार नेले. हैदराबादकडून पॅट कमिन्स, शिवांग कुमार आणि साकिब हुसैन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली, मात्र ते केकेआरला रोखण्यात अपयशी ठरले.
Comments are closed.