IPL 2026: मुंबई इंडियन्समधून 3 खेळाडूंची गच्छंती! आयपीएल 2026 नंतर फ्रँचायझी घेणार कठोर निर्णय
मुंबई इंडियन्ससाठी (MI) आयपीएल 2026 चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरत आहे. संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 2 सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे. या खराब कामगिरीमुळे मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा (Eliminate होणारा) पहिला संघ ठरू शकतो. इथून प्लेऑफमध्ये पोहोचणे मुंबईसाठी आता जवळपास अशक्य झाले आहे. या सततच्या पराभवांमुळे पुढच्या हंगामात संघातील काही बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. असे 3 खेळाडू ज्यांची गच्छंती जवळपास निश्चित मानली जात आहे.
ट्रेंट बोल्ट
या यादीत पहिले नाव आहे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे (Trent Boult). बोल्टला मुंबईने या हंगामासाठी 12.50 कोटी रुपये मानधन देऊन संघात घेतले होते. मात्र, त्याची कामगिरी अत्यंत साधारण राहिली आहे. बोल्टने या हंगामात 5 सामने खेळले असून त्यात त्याला केवळ 2 विकेट्स मिळवता आल्या आहेत. ही खराब आकडेवारी पाहता, पुढच्या लिलावापूर्वी मुंबई त्याला संघातून मुक्त (Release) करू शकते.
दीपक चहर
दीपक चाहरला (Deepak Chahar) मुंबईने 9.25 कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीत रिटेन केले होते. परंतु, तो आपल्या किमतीला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. दीपकने या हंगामात 3 सामने खेळले असून त्यात त्याला फक्त 1 विकेट मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने खूप धावा लुटवल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट 13.38 इतका प्रचंड आहे. त्यामुळे मुंबई त्याला पुढील हंगामात संघात ठेवण्याची शक्यता कमी आहे.
शार्दुल ठाकूर
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या हंगामात 2 कोटी रुपयांच्या किमतीत मुंबईकडून खेळत आहे. त्याला ट्रेडच्या माध्यमातून संघात सामील करून घेण्यात आले होते. गेल्या हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला होता. या सीजनमध्ये त्याने 7 सामने खेळले असून 5 डावांत 6 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीतही त्याने 2 डावांत केवळ 14 धावा केल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्याने त्यालाही पुढच्या वर्षी संघातून वगळले जाऊ शकते.
Comments are closed.