मोठी बातमी! मित्तल कुटुंब, आदर पूनावाला यांनी राजस्थान रॉयल्स फ्रॅंचायजी 13700 कोटी रुपयांना खरेदी केली
लक्ष्मी एन मित्तल, आदित्या मित्तल आणि आदर पूनावाला यांच्या संघाने आयपीएल फ्रॅंचायजी राजस्थान रॉयल्स (पार्ल रॉयल्स आणि बार्बाडोस रॉयल्सचाही समावेश) सुमारे १.६५ अब्ज (जवळपास १३७०० कोटी रुपये) डॉलर्सला विकत घेतली आहे. या संदर्भात लवकरत एक निवेदन जाहीर केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरआरच्या फ्रॅंचायजीमध्ये मित्तल कुटुंबाचे ७५%, आदर पूनावालाचे १८%
आणि उर्वरित ७% सध्याचे मालक मनोज बडाले यांच्याकडे आहेत. हा व्यवहार बीसीसीआय, सीसीआय, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि इतर संबंधित नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीसह पूर्ण केला गेला आहे. तसेच २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत त्याची पूर्तता होण्याची अपेक्षा आहे.
आर्सेलर मित्तलचे चेअरमन लक्ष्मी एन मित्तल, सीईओ आदित्य मित्तल, नॉन-इंडिपेंडेंट डायरेक्टर वनिषा मित्तल भाटिया, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला आणि मनोज बदाले हे राजस्थान रॉयल्सच्या संचालक मंडळात सामील होतील.
मार्च २१ ला कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील समूह १.६३ अब्ज डॉलर्समध्ये फ्रॅंचायजी खरेदी करण्याच्या शर्यतीत होता आणि त्यांनी त्यांनी एक विशेष करारही केला होता, मात्र आवश्यक निधी उभारण्यात अपयश, नियामक अनिश्चितता आणि आयपीएल फ्रॅंचायजीसाटी खरेदीदारांच्या समूहाच्या रचनेमुळे त्या प्रयत्नांना अपयश आले.
Comments are closed.