आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या

शरद पवार आणि पार्थ पवार आगामी राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 7 जागांवरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यंदा राज्यसभेवर (Rajya Sabha Election 2026) पवार घराण्यातून आजोबा आणि नातू दोघे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून (Mahayuti) राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या दोघांनी 6 मार्चला निवडणूक आयोगाकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी नियमाप्रमाणे या दोघांनी आपल्या संपत्तीचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. या प्रतिज्ञापवार नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार (Parth Pawar) हे त्यांचे आजोबा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे दिसून येते. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे. (Maharashtra Politics news)

Sharad Pawar Weatlh: शरद पवार यांची मालमत्ता

जंगम मालमत्ता ४४ कोटी ७२ लाख रुपये, रोख रक्कम- १ लाख २५ हजार रुपये

बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी
११ कोटी ६६ लाख रुपये

समभाग, म्युचुअल्स फंड आदी- २७ कोटी रुपये

सोने व चांदीचे दागिने वस्तू- ३ कोटी ८५ लाख रुपये

स्थावर मालमत्ता- बारामतीतील शेती, घर, सदनिका आदी मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य- १५ कोटी ९९ लाख रुपये

दायित्व- सुप्रिया एंटरप्रायजेसचे सुमारे ४९ लाख ८४ हजार रुपये दायित्व

एकूण मालमत्ता – ६० कोटी ७१ लाख रुपये

Parth Pawar Wealth: पार्थ पवार यांची संपत्ती

जंगम मालमत्ता- ११ कोटी ३५ लाख रुपये

बँका, टपाल विभाग, विमा व वित्तसंस्थामधील मुदत ठेवी
३ कोटी ६८ लाख रुपये

समभाग, म्युच्युअल फंडस आदी
१ कोटी १७ लाख रुपये

सोने चांदीचे दागिने वस्तू
१ कोटी ३१ लाख रुपये

स्थावर मालमत्ता- बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर याचे सध्याचे अंदाजे मूल्य
७६ कोटी ९८ लाख रुपये

बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज
92 लाख 48 हजार रुपये

एकूण मालमत्ता- ८८ कोटी ३३ लाख रुपये

आणखी वाचा

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले

राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.