राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त 6 दिवस उरले, शरद पवार रुग्णालयात, राष्ट्रवादीने मविआकडे वे

राज्यसभा निवडणूक 2026: येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (MVA Alliance) गोटात आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातील 7 जागांपैकी सहा जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून जाऊ शकतो. शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्यसभेची (Rajya sabha Election 2026) मुदत संपत असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. मात्र, शरद पवार सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाने काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे वेळ मागितला आहे. (Maharashtra Politics news)

राज्यसभा निवडणुकीसाठी 3 मार्चला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. सध्या अर्ज भरण्यासाठी सहा दिवस राहिलेले असताना महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार म्हणून कोणते नाव पाठवायचे? यावर अद्याप मविआची एकत्रित चर्चा झालेली नाही. राज्यसभेसाठी महाविकास आघाडी मिळून संख्याबळानुसार एकच उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे आणि या एकाच जागेवर तिन्ही पक्षांकडून उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितला असून शरद पवार व आपल्या पक्षातील इतर नेत्यांसोबत एकत्र चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर शरद पवारांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी संदर्भातला पुढचा निर्णय पक्ष महाविकास आघाडीला कळवला जाईल. तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना दोन्ही पक्ष राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा करत असून दोन्ही पक्ष आपल्या पक्षाचे उमेदवार देण्यावर इच्छूक आहेत.

NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड उद्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही उद्या 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता वरळी डोम येथे होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,वर्किंग कमिटी सदस्य,राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी (आमदार/खासदार) यांचा समावेश असणार आहे. कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भातील प्रस्ताव हा बैठकीत मांडतील. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते अनुमोदन देतील आणि त्यानंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडेल.

आणखी वाचा

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, एक नाव ठरलं, विनोद तावडे अन् धैर्यशील पाटीलही शर्यतीत

आणखी वाचा

Comments are closed.