राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची
राज्यसभा निवडणूक 2026: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार आधीच निश्चित केले होते. मात्र एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यसभेचा उमेदवार कोण असणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती. अखेरीस शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता मंत्री संजय शिरसाट यांनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी का दिली? याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, तुमचा सस्पेन्स दूर केला आहे. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. शिंदे साहेब माझी लाडकी बहीण म्हणतात, लाडक्या बहिणीला उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. शिंदे साहेब सगळ्यांना सामावून घेतात. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी एकनाथ शिंदे दूर करतील, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Shirsat : …म्हणून ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, नेमका वेळेला, नेमका विचार म्हणजे एकनाथ शिंदे. आम्ही मानसिक आणि राजकीय बळ वाघमारे यांना दिले आहे. सर्वसामान्य शिवसैनिक जी एका छोट्या गावातून येते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही. पण, त्यांनी सभा गाजवल्या. शिवसेनेत येऊन मेहनत घेतली आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Rajya Sabha Election 2026: शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून नाराजी
दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. अमित शाह यांच्याकडून राज्यपाल पदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, दोन वर्ष उलटून गेले तरी सुद्धा आश्वासन पूर्ण केलं नाही. मी चार टर्म खासदार राहिलो आहे. मला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी माझं नाव द्यावं, ही माझी इच्छा होती. मात्र, ज्योती वाघमारे यांचं नाव कसं समोर आलं? हे मला कळलं नाही, असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रमहाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य)
शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)
Maharashtra Candidate List Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी?
भाजपचे उमेदवार- (BJP Rajya Sabha Election Candidate List)
- रामदास आठवले
- विनोद तावडे (Vinod Tawde)
- माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate)
- रामराव वडकुते (Ramrao Wadkute)
शिवसेना शिंदे गट-
- ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-
- पार्थ पवार (Parth Pawar)
महाविकास आघाडी – शरद पवार (Sharad Pawar)
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.