ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? शिंदेंनी सांगितलं कारण, शरद पवारांचंही घेतलं नाव

मराठी : राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होती. आज निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार आधीच निश्चित केले होते. मात्र एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यसभेचा उमेदवार कोण असणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती. अखेरीस शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे  (Jyoti Waghmare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अनेकजण इच्छुक असताना ज्योती वाघमारे यांनाच उमेदवारी का दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती, पण आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिली

शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करत असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिल्याचे शिंदे म्हणाले. शिवसेनेनं केलेली निवड सार्थक ठरेल. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्वांची भावना होती असे एकनाथ सिंदे म्हणाले. शरद पवार यांची विनंती आणि सर्वांच्या म्हणण्यानुसार निवडणूक बिनविरोध झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

मला वाटलं नव्हतं की, कधी हा दिवस येईल : ज्योती वाघमारे

मला वाटलं नव्हतं की, कधी हा दिवस येईल. कारण लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितला. लहानपणापासून भुकेचे चटके सोसले. लहानपणापासून संघर्ष केला. त्यानंतर शिवसेना सेनेच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा वाटलेलं की यापेक्षा मोठा काहीही होऊ शकत नाही. परंतु शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की, शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. आज कुठल्याही पद्धतीचे आरक्षण नसताना माझ्यासारखी दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचते आहे, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दिलेल्या संधीचं सोनं करेन : ज्योती वाघमारे

ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता ज्योती वाघमारे म्हणाल्या की, मी खूप साधी मुलगी आहे. मी खूप गरीब मुलगी आहे. मला राजकारण कळत नाही. पण मला विश्वास आहे की, माझे नेते एकनाथ शिंदे यांनी जी संधी मला दिली, त्या संधीचं सोनं मी करेन. ज्येष्ठ नेत्यांचे योगदान पक्षासाठी खूप महत्त्वाचे आहे. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्णयासोबत सगळे जण थांबतील आणि सगळ्यांना आनंद वाटेल की, कुठलाही वारसा नसलेली, कुठल्याही घराण्याची परंपरा नसलेली देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

Rajya Sabha Election 2026: लहानपणापासून भुकेचे चटके सोसले, संघर्ष केला, दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार, शिंदे साहेबांनी…; राज्यसभेची उमेदवारी मिळताच ज्योती वाघमारेंची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.