आमदार संतापला! आमचा जन्म केवळ समर्थन द्यायला झालाय का? निवडणुकीच्या संदर्भात MIM ची मोठी घोषणा

राज्यसभा निवडणूक 2026: राज्यसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 10 राज्यातील एखूण 37 रिक्त जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाविकास आघाडी एकत्र आली तरच त्यांचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. दरम्यान, अशातच बिहारमधील एमआयएमच्या आमदारानं मोठं वक्तव्य केलं आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तरुल ईमान यांनी बिहारमधून राज्यसभा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. आमचा जन्म केवळ समर्थन द्यायला झालाय का? असा सवाल देखील ईमान यांनी केलाय. त्यामुळं बिहारमध्ये एमआयएम राज्यसभेच्या निवडणुकीत उडी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एमआयएमकडून बिहारमधून राज्यसभा लढवण्याची तयारी सुरु

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तरुल ईमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयएमनं बिहारमधून राज्यसभा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. ज्या पक्षांना सरकारविरोधात लढायचं आहे, ज्यांना दलितांचं हित हवं आहे, त्यांनी ओवैसींचं हात बळकट करावेत, असं आवाहन ईमान यांनी केलं. बिहारमध्ये एमआयएमचे 5 आमदार  देखील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएमनं बिहारच्या सीमांचल भागात ताकद दाखवली आहे. त्यामुळं यावेळची राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. आमचा जन्म केवळ समर्थन द्यायला झालाय का? मला कोण पाठिंबा देईल असा प्रश्न तुम्ही का विचारत नाही, असे प्रश्न ईमान यांनी विचारले. राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले होते. यावर ईमान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील पक्षांचे राज्यसभेत प्रतिनिधी आहेत. तिथे आमचा एकही सदस्य नाही. त्यामुळे आम्हाला तिथे प्रतिनिधीत्व हवं आहे, असे ईमान म्हणाले. बिहारच्या विधानसभेत एकूण 243 आमदार आहेत. हे आमदार राज्यसभेसाठी मतदान करतील. पाच जागा रिक्त होत आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी 41 मतांचा कोटा आहे. सध्याच्या घडीला एनडीएकडे 202 आमदारांचं बळ आहे. त्यांच्या आधारे सत्ताधारी युती 4 जागा सहज जिंकू शकते. त्यानंतरही त्यांच्याकडे बरीच मतं शिल्लक राहतात. त्यांनी पाचवा उमेदवार दिल्यास क्रॉस व्होटिंग होऊ शकतं.

राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार, महाराष्ट्राच्या वाट्याला सात जागा

राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला सात जागा आहेत. भाजपचे चार तर मित्र पक्ष शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेवर निवडल्या जातील. या चार जागांसाठी भाजपमध्ये चुरस दिसून येत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.