पेड्डी चित्रपटात राम चरण दिसणार पैलवानाच्या भूमिकेत, लूक सोशल मीडियावर व्हायरल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या आगामी ‘पेड्डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 4 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्या आधीच राम चरणच्या लूकची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. सध्या सोशल मीडियावर राम चरणच्या या लूकबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा घडू लागली आहे. यामध्ये राम चरणची बाॅडी आणि त्याची दाढी या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना अतिशय भावलेल्या आहेत.

राम चरणचा नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये राम चरण विमानतळावर दाखल होताना दिसत आहे. त्याने निळ्या रंगाची शॉर्ट्स आणि नेव्ही रंगाची पँट घातली आहे. लांब केस, पूर्ण दाढी आणि सनग्लासेसमुळे तो कमालीचा देखणा दिसत आहे. विमानतळावरून चालताना तो आपल्या फोनकडे पाहत असल्याचे दिसत आहे. त्याच्या सुडौल शरीरयष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राम चरण ‘पेड्डी’ या चित्रपटामध्ये एका पैलवानाची भूमिका वठवत आहे. याकरता त्याने खूप मेहनत घेतलेली दिसून येत आहे.

येत्या 16 मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘पेड्डी’ हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. मूळतः 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता तो 4 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे असे वृत्त एबीपीने दिले आहे. 16 मे रोजी भोपाळमध्ये एका भव्य कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होणार असून, या सोहळ्याला अनेक प्रमुख कलाकार उपस्थित राहणार आहेत. या चित्रपटात राम चरणसोबत जान्हवी कपूरही दिसणार आहे. चाहते बऱ्याच काळापासून याची वाट पाहत आहेत, पण आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

Comments are closed.