सोनम कपूरने दुसऱ्या मुलाचे नाव केले जाहीर; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवुडची ‘स्टाईल आयकॉन’ अभिनेत्री सोनम कपूर आणि व्यावसायिक आनंद आहुजा 29 मार्च 2026 रोजी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सोनम कपूरने मातृदिनाच्या एक दिवस आधी दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. जवळपास एका महिन्यानंतर सोनम कपूरने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. आणि त्याचा अर्थही सांगितला आहे. सोनम कपूरने सोशल मीडियावर पोस्ट करत तीच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहिर केले आहे. सोनमने तिचा पती आनंद आहुजा आणि दोन्ही मुलांसोबतच एक फोटो शेअर केला आहे.

सोनम कपूरने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव ‘रुद्रलोक कपूर आहुजा’ ठेवले आहे. सोशल मिडियावर फोटोसह ही बातमी जाहीर करताना सोनमने तिचा मुलगा रुद्रलोक कपूर आहुजा आणि मोठा भाऊ वायू कपूर आहुजा यांचा जन्म ही एक “दैवी जोडी” असल्याचे म्हटले. ती पुढे म्हणाली, ज्या दैवी शक्तीने पुन्हा एकदा आमचे आयुष्य बदलून टाकले आहे, तिच्याच प्रेरणेने आम्ही रुद्रलोक कपूर आहुजा याचे प्रेम आणि कृतज्ञतेने स्वागत करत आहोत.

नाव जाहीर करण्यासोबतच सोनमने त्या नावामागील कारण स्पष्ट केले आहे. “वेदांमध्ये, ‘रुद्र’ हा शब्द ‘गर्जना करणे’ या धातूपासून आला असून तो सर्वश्रेष्ठ आहे. जो दुःखाचा मुळापासून नाश करणारा, वादळे, श्वास, आरोग्य आणि नूतनीकरण यांमागील दैवी शक्ती आहे. तो वायूशी, म्हणजेच सर्व जीवांमध्ये संचार करणाऱ्या प्राणाशी खोलवर जोडलेला आहे.

सोनम आणि आनंद अहुजाने मुलाचे नाव जाहीर केल्यानंतर इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींसह चाहत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हार्टचे इमोजी देत कमेण्ट्स केल्या आहेत.

Comments are closed.