देवेंद्र फडणवीस हा देवमाणूस, हर्षवर्धन सपकाळांनी बोलताना स्वत:ची लायकी ओळखून बोलावं : राम कदम

हर्षवर्धन सपकळवरील राम कडम: औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. अशा बोचऱ्या शब्दात  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान याच मुद्द्यावर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी  जोरदार हल्लाबोल करत हर्षवर्धन सपकाळांवर तोफ डागली आहे.

काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष यांना नशिबाने लॉटरी लागली आहे. गांधी परिवाराला खुश करण्याच्या नादात स्वतःची लायकी ओळखून त्यांनी माध्यमांसमोर बोलावं. देवेंद्र फडणवीस यांची देव माणूस म्हणून ओळख आहे. ज्यांची कारकीर्द निष्कलंक राहिली आहे. शिवाय त्यांच्यावर बोलण्याआधी प्रांताध्यक्ष यांनी आरशासमोर बसून आपली लायकी ओळखावी आणि मग बोलावं, असे म्हणत राम कदमांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्याकडे काही विषय असतील तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण माध्यमांना ब्रेकिंग देण्यासाठी, गांधी परिवाराला खुश करण्यासाठी लायकी ओळखून बोलावं. असा खोचक सल्लाही आमदार राम कदमांनी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना दिला आहे.

मुख्यमंत्र्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न- चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्यानं हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न असल्याची घणाघाती टीका करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chanrashekhar Bavankule) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री पदाचा अवमान, हर्षवर्धन सपकाळांवर गुन्हा दाखल व्हावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगेजबशी करून मुख्यमंत्री पदाचा अवमान केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ वर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आमदार परिणय यांनी केली आहे. आज विधिमंडळात पण हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे आमदार परिणय फुके म्हणाले.  तर शिवसेनेने देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. औरंगजेबाची तुलना हि देवेंद्र फडणवीसांशी करणे योग्य नाही. हि बौद्धिक दिवाळखोरी आहे. याची योग्य दखल घेतली जाईल, असे मंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले. तर आज विधिमंडळात पण हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे आमदार परिणय फुके म्हणाले.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.