राम मंदिर देणगी घोटाळा: चंपत राय यांचा पोलिसांसमोर मोठा खुलासा

राम मंदिर, राम मंदिर दान घोटाळा | राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आणि अख्ख्या देशात खळबळ माजली आहे. . मंदिरातील देणगीच्या नावाखाली झालेल्या या घोटाळा प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. याच प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. पोलिस चौकशीदरम्यान त्यांनी अने दावे केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ट्रस्टला जूनच्या पहिल्या आठवड्यातच देणगी चोरीला जात असल्याची माहिती मिळाली होती असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे..

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एक मोठा खुलासा केला आहे. चंपत राय यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी स्वतः एसआयटीकडे या प्रकरणाची तक्रार दिली होती आणि त्याच आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ही तक्रार दाखल करण्यात आपल्याकडून उशीर झाला, ही आपली चूक असल्याचे त्यांनी जबाबात कबूल केले आहे. ट्रस्ट अंतर्गत पातळीवर या प्रकरणाचा तपास करत राहिल्याने हा उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. ५ जून रोजी जेव्हा ट्रस्टचे लोक आरोपी अविनाश शुक्ला याच्या घरी गेले होते आणि तिथून कॅश जप्त करण्यात आली होती, त्यावेळचे फुटेज आणि माहिती ट्रस्टला आधीच मिळालेली होती असा खुलासा देखील त्यांनी केला.

दरम्यान, या चौकशीदरम्यान चंपत राय यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगल्याचे असल्याची माहिती समोर येत आहे.. या दरम्यान चंपत राय पोलिसांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकलेले नाहीत. सध्या पोलीस चंपत राय, गोपाल राय आणि अनिल मिश्रा यांच्यासह ट्रस्टच्या अनेक सदस्यांची आर्थिक माहिती गोळा करत असून, त्यांच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेची चौकशी केली जात आहे.

Comments are closed.