आरोपांशिवाय त्यांच्याकडं दुसरं काही करायला आहे का? राणा जगजीतसिंह पाटलांचा ओमराजेंना टोला
Ranajagjitsinh Patil on Omraje Nimbalkar : तुळजापूर (Tuljapur)विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपूर्वी 6 हजार बोगस मतदार नोंदणी झाल्याचा गंभीर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आरोपांशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही करायला आहे का? असा सवाल करत राणाजगजीतसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना टोला लगावला.
तुळजापूर प्रकरणांमध्ये जे आरोप आहेत त्याची चौकशी व्हायला हवी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहा हजार बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. हे सर्व बोगस उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित कॉलेजच्या असल्याचा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरोप केला होता. तसेच तुळजापूर बोगस मतदार नोंदणी प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली होती. देशभरात मत चोरीचा मुद्दा गाजत असतानाच धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहा हजार बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे. बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न करणारे लोक हे भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मुंबईतील तेरणा कॉलेजशी संबंधित असल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपावर त्यांना आरोपाशिवाय दुसरं काय येतं का? असं म्हणत राणाजगजितसिंह पाटलांनी खोचक टिका केली. तसेच तुळजापूर प्रकरणांमध्ये जे आरोप आहेत त्याची चौकशी व्हायला हवी असे मतही त्यांनी यावेळी मांडले. बोगस मतदार नोंदणी प्रयत्नात पोलीस विभागाकडून अद्याप कुठलीही चौकशी झाली नसल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2024 या काळात तुळजापूर तहसील कार्यालयात नवीन मतदार नोंदणीसाठी अचानक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज दाखल झाले. या अर्जांची तपासणी करताना अनेक अर्जदारांच्या आधार कार्डांमध्ये एकाच नामांकन क्रमांकाचा वापर झालेला दिसला. आधारवरील डिजिटल सहीची तारीख आणि वेळ एकसमान होती, फोटो सारखाच असताना नावे मात्र वेगवेगळी होती. याशिवाय, बीएलओंनी केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीतही अर्जदार नमूद पत्त्यावर आढळले नाहीत. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने तुळजापूर येथील बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
तुळजाभवानी मंदिरावरुन भावकीत जुंपली; आ. राणा पाटलांचा जुना व्हिडिओ दाखवत ओमराजे निंबाळकरांचा सवाल
आणखी वाचा
Comments are closed.