माझ्याकडून चूक झाली… सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून ‘त्या’ गुन्ह्याची कबुली; म्हणाला…

रणवीर अल्लाहबाडिया स्टेटमेंट वाद प्रकरण: ‘इंडियाज़ गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं (YouTuber Ranveer Allahabadia) नाही, नाही म्हणता म्हणता अखेर आपला जबाब महाराष्ट्र सायबर सेलच्या (Maharashtra Cyber ​​Cell) मुख्यालयात जाऊन नोंदवला. यावेळी माध्यमांचे कॅमेरे पाहून रणवीरनं तोंड लवपून पळ काढल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता रणवीरनं सायबर सेलसमोर नोंदवलेल्या जबाबात तपास अधिकाऱ्यांसमोर आपली चूक मान्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ‘इंडियाज़ गॉट लेटेंट’मध्ये आई-वडिलांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियावर चोहीकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी त्याच्या आणि शोविरोधात अनेक एफआयआरही दाखल करण्यात आल्या होत्या.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर अलाहाबादियानं पोलिसांना सांगितलं की, समय रैना त्याचा मित्र आहे, त्यामुळे त्यानं त्याच्या ‘इंडियाज़ गॉट लेटेंट’ शोमध्ये हजेरी लावली होती. तसेच, पुढे बोलताना ज्या वक्तव्यावरुन सध्या वाद सुरू आहे, ते बोलणं माझी चूक होती, असंही रणवीर अलाहाबादिया म्हणाला आहे.  रणवीरनं महाराष्ट्र सायबर सेलला दिलेल्या जबाबात आपला गुन्हा कबूल केला आहे आणि माझ्याकडून चूक झाली, असं म्हणत आपली चूकही त्यानं मान्य केली आहे.

रणवीर अलाहाबादियानं पुढे बोलताना हेदेखील सांगितलं आहे की, त्यानं ‘इंडियाज़ गॉट लेटेंट’च्या एपिसोडमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतलेले नव्हते. तसेच, रणवीरनं पोलिसांना सांगितलं की, आम्ही युट्यूबर आहोत आणि याचमुळे एकमेकांच्या शोमध्ये मैत्रिखातर हजेरी लावतो.

प्रकरण नेमकं काय?

युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या रणवीर अलाहाबादिया ‘इंडियाज़ गॉट लेटेंट’ शोमध्ये विचारलेल्या एका प्रश्नामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याला बीअरबायसेप्स नावानं ओळखलं जातं. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये दिसून आला होता. ज्यामध्ये त्यानं स्पर्धकांना त्याच्या आई-वडिलांबाबत एक अश्लील प्रश्न विचारला. रणवीरचा हा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैनाही थक्क झाला होता. लगेचच त्यानं रणवीरच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत, हा काय मूर्खपणा आहे, अशी विचारणाही केली. रणवीरच्या प्रश्नानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

रेवेनर ल्लाहबादिया आठवड्यातील वादाच्या कॅस: हे नाही, हे हे करते, होय, होय, अक्षरे रणवीर अलाहाबादिस अधिक; मीडियाचा कॅमेरा आणि तोंड लोडिंग चेहरा पहात आहात

अधिक पाहा..

Comments are closed.