कट्टर विरोधकांची अखेर दिलजमाई; रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर एकाच व्यासपीठावर, मंचावरूनच वाद सं
रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर: जालन्यातील (जालना वार्ता) परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्ष राजकीय हाडवैर असलेल्या भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (रावसाहेब दानवे) आणि भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (बबनराव लोणीकर) या दोघांनी एकाच व्यासपीठावर येत ‘वाद संपल्याची’ घोषणा केली. परतूरच्या राजकीय इतिहासात हा महत्त्वपूर्ण क्षण मानला जात आहे.
रावसाहेब दानवे: दानवेंची 40 वर्षांनंतर परतूरमध्ये प्रवेश
भाजपने परतूर नगरपालिकेसाठी स्वतंत्र उमेदवार उभे केले असून, त्यांच्या प्रचारासाठी रावसाहेब दानवे हे 40 वर्षांनंतर प्रथमच बबनराव लोणीकरांचा बालेकिल्ला परतूरमध्ये दाखल झाले. दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर वातावरणात उत्सुकता निर्माण झाली. मंचावर दोघांमध्ये मुक्त गप्पा रंगल्या आणि परतूर नगरपालिका सोबतच संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण एकत्र आणण्याचा निर्धार दोघांनीही जाहीरपणे व्यक्त केला. मागील अनेक वर्षांपासून परतूर तालुक्यात दानवे–लोणीकर गटातल्या मतभेदांची चर्चा कायम होती. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने दोघांनी ते वैमनस्य संपल्याची घोषणा थेट मंचावरूनच केली.
रावसाहेब दानवे: काय म्हणाले रावसाहेब दानवे?
मंचावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी विनोदी शैलीत बबनराव लोणीकरांना उद्देशून काही ठळक विधानं केली. “बबनरावतुमची वेळ आली आहे. आता तुम्ही मागे व्हा आणि राहुल लोणीकरला पुढे करा,” असे त्यांनी म्हटले. त्यानंतर विधानसभेतील लोणीकरांच्या दीर्घ कारकिर्दीवर भाष्य करत दानवे म्हणाले की, “तुम्ही आठ विधानसभेच्या निवडणुका लढलात. आठ वेळा तुमचं 'बाळंतपण’ झालं, पण एक टाका तरी पडला नाही तुम्हाला,” असे मिश्कील वक्तव्य देखील त्यांनी केले.
रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, मी तुमच्या पाठीशी आहे आणि जे नाही त्यांना सोबत घेऊन पार्टीला सांगू की, बबनरावने घोषणा केली विधानसभा लढणार नाही, त्यांना परभणी लोकसभेची जागा सोडा. हरिभाऊ बागडे यांनी निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केल्यानंतर पार्टीने त्यांना राज्यपाल केलं. बबनराव तुम्हाला जर राज्यपाल केलं तर आमचं ध्यान ठेवा बाबा, पार्टीचं काही सांगता येत नाही, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. या वक्तव्यांवर उपस्थितांमधून एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
बबनराव लोणीकर: काय म्हणाले बबनराव लोणीकर?
बबनराव लोणीकर म्हणाले की, आम्ही दोघे आता एकत्र काम करणार असून, आगामी निवडणुकांत मोठ्या संख्येने भाजपचे सदस्य निवडून आणू. आता आमच्यात कुठलाही वाद राहिला नाही. निवडणुकांत सर्वाधिक विजयी होणारे सदस्य भाजपचे असतील. आम्ही एकत्र आल्याने आता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे, असे त्यांनी म्हटले.
रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर: दोन गट एकत्र आल्याने भाजपला निवडणुकीत बळ?
दोन्ही नेत्यांमधील जुना वैर निवडणुकीच्या निमित्ताने संपल्याने आगामी परतूर नगरपालिका निवडणुकीत भाजपची स्थिती मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दशकांतील पहिल्यांदाच झालेल्या या दिलजमाईमुळे स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.