बबनराव, आठ वेळा तुमचं बाळंतपण झालं पण एक टाका सुद्धा पडला नाही; रावसाहेब दानवे कट्टर विरोधक बबन


बबनराव लोणीकरांवर रावसाहेब दानवे : परतूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांचा अनेक वर्षांचा राजकीय बेबनाव संपल्याची घोषणा झाली. मात्र, मंचावर दानवेंनी केलेली मिश्कील वक्तव्यांची जोरदार चर्चा आता जालन्यात रंगली आहे.

भाजपने परतूर नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. प्रचारासाठी रावसाहेब दानवे 40 वर्षांनंतर प्रथमच लोणीकरांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले. दोन्ही नेते एकत्र येताच वैमनस्य संपल्याची घोषणा झाली. मात्र मंचावर दानवेंनी केलेली भाषणातील वाक्ये अधिक चर्चेत राहिली.

Raosaheb Danve on Babanrao Lonikar: बबनराव, तुमची वेळ आली आहे

भाषणाच्या सुरुवातीलाच दानवेंनी लोणीकरांकडे बघत स्पष्ट शब्दांत म्हणाले की, “बबनराव, तुमची वेळ आली आहे. आता तुम्ही मागे व्हा आणि राहुल लोणीकरला पुढे करा.” यानंतर त्यांनी लोणीकरांच्या राजकीय प्रवासावर मिश्कील भाष्य करत उपस्थितांत हशा पिकवला. “तुम्ही आठ विधानसभेच्या निवडणुका लढलात. आठ वेळा तुमचं ‘बाळंतपण’ झालं, पण एक टाका तरी पडला नाही तुम्हाला, ” असे मिश्कील वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी करताच उपस्थित कार्यकर्ते खळखळून हसले.

Raosaheb Danve on Babanrao Lonikar: तुम्हाला जर राज्यपाल केलं तर

दानवे पुढे म्हणाले की, “मी तुमच्या पाठीशी आहे. आणि जे नाही त्यांना सोबत घेऊन पार्टीला सांगू की, बबनराव विधानसभा लढणार नाही. मग त्यांना परभणी लोकसभेची जागा द्या. हरिभाऊ बागडे म्हणाले मी निवडणूक लढवणार नाही, पार्टीने त्यांना राज्यपाल केलं. बबनराव, तुम्हाला जर राज्यपाल केलं तर आमचं ध्यान ठेवा बाबा. पार्टीचं काही सांगता येत नाही,” असे त्यांनी म्हटले.

Babanrao Lonikar: आता आमच्यात कोणताही वाद नाही: बबनराव लोणीकर

दरम्यान, बबनराव लोणीकर भाषणात म्हणाले की, आम्ही दोघे आता एकत्र काम करणार असून, आगामी निवडणुकांत मोठ्या संख्येने भाजपचे सदस्य निवडून आणू. आता आमच्यात कुठलाही वाद राहिला नाही. निवडणुकांत सर्वाधिक विजयी होणारे सदस्य भाजपचे असतील. आम्ही एकत्र आल्याने आता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे, असे त्यांनी म्हटले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Raosaheb Danve and Babanrao Lonikar: मोठी बातमी: कट्टर विरोधकांची अखेर दिलजमाई; रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर एकाच व्यासपीठावर, मंचावरूनच वाद संपल्याची घोषणा

आणखी वाचा

Comments are closed.