मुंबईत संपवलं, सुटकेसमधून चिपळूणमध्ये आणलं, आंब्याच्या बागेत विल्हेवाट लावली पण एक चूक भोवली
रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूण पोलिसांना एका खून प्रकरणाचा उलगडा लावण्यात यश आलं आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत एका व्यक्तीचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकून गावात आणून आंब्याच्या बागेत विल्हेवाट लावण्यात आली होती. हा प्रकार जिल्ह्यातील चिपळूणमधील रामापूरच्या आवटेवाडीत घडला होता. पाच महिन्यांनी प्रकरण बाहेर आलं असून दोघांना अट करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावं विशाल खोडदेकर आणि प्रेयसी जन्नातूनिसा खान अशी आहेत. दोघांना न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे या प्रकरणाचा उलगडा कसा लागला हे सांगितलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
चिपळूण मधील रामपूर गावातल्या आवटेवाडी येथे 31 मार्च रोजी आंबा बागेमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मानवी हाडांचे गूढ शोधण्यात चिपळूण पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात खून प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला मुंबईतील मालाड मधून अटक केलं होतं.
विशाल खोडदेकर याचे मोबाईल स्विच ऑफ होते. मात्र, त्याचे फेसबुक सुरु होतं. तपास पथक पाठवून विशाल खोडदेकर याला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच पैशांच्या देवाण घेवाणीतून एजाज कुरेशीला मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला, असं खोडदेकरनं सांगितल्याचं फुलचंद मेंगडे म्हणाले.
विशाल खोडदेकराची प्रेयसी जन्नतुनिसा खान मालाडमध्ये राहते, तिनं हेवी डिपॉझिट या तत्वावर एजाज कुरेशीकडून राहण्यासाठी दोन वर्षापूर्वी घरं घेतलं होतं, त्या घरात ती राहत होती. जन्नतुनिसा खान हिनं एजाज कुरेशीकडे पैशांसाठी तगादा लावला होता. या वादातून मारहाण झाली, त्यात एजाज कुरेशीचा मृत्यू झाला, असं पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितलं.
मुंबई येथील मालाड परिसरात राहणाऱ्या एजाज कुरेशी यांची आर्थिक व्यवहारावरून आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खान दोघांनी मिळून हत्या केली होती. हत्येनंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून प्रियकर विशाल खोडदेकर याच्या गावी असलेल्या आंब्याच्या बागेत मृतदेह फेकण्यात आला होता. विशाल खोडदेकर यानं एजाज कुरेशी याचा मृतदेह 15 नोव्हेंबर 2025 मध्ये बागेत फेकलेली सुटकेस मधील मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत दिसल्याने विशाल खोडदेकर याने फेब्रुवारी महिन्यात येत डिझेलचा वापर करत मृतदेह जाळला.
पोलिसांनी घटनास्थळी मिळालेली हाडे, अंगठी आणि पायातील लोखंडी रॉड याच्या मदतीने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहे. अवघ्या 24 तासात आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खान यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे..
आणखी वाचा
Comments are closed.