Ratnagiri News – हर्णे समुद्रात डिझेल तस्करी करणारी नौका पकडली, आतापर्यंत 300 टन डिझेल तस्करीची कस्टमची माहिती
दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी डिझेल तस्करी करणारी ‘रत्नमाऊली’ ही नौका कस्टम विभागाने पकडली आहे. गेल्या दोन महिन्यात रत्नमाऊली या नौकेतून 300 टनहून अधिक डिझेलची तस्करी करून विक्री करण्यात आली, अशी माहिती कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी दिली.
हर्णे किनारपट्टीवर एक मच्छिमार नौका तस्करीचे डिझेल विकत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली. त्यांनी रत्नमाऊली या नौकेचा शोध घेऊन ती नौका पकडली. पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारे समुद्रकिनाऱ्यावर डिझेल तस्करीच्या घटना घडत असल्यास तात्काळ 8796895990 संपर्क साधावा, असे आवाहन कस्टम विभागाने केले आहे.
Comments are closed.