Ratnagiri News – आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कडवईच्या डॉ. अभिराज नारकर यांचा डंका; मलेशियात मुंबई संघासह पटकावले विजेतेपद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे दंतशल्य चिकित्सक डॉ. अभिराज नारकर यांनी मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाकडून खेळत विजेतेपद पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया तसेच देशातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा येथील संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेडने गोवा संघाचा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

गेली १७ वर्षे कडवई येथे दंतशल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. नारकर यांनी टेनिस व लेदर क्रिकेटमध्ये विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वी त्यांनी श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसह पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही उत्कृष्ट खेळ करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.वैद्यकीय व्यवसाय सांभाळत क्रिकेटची आवड जोपासत आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशाबद्दल डॉ. अभिराज नारकर यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.