Ratnagiri News – तटरक्षक दलाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीच्या वतीने आज सकाळी एका योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तटरक्षक दलाच्या जवानांसह विविध शाळा आणि सरकारी विभागांमधून आमंत्रित केलेल्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची संकल्पना ” निरोगी वार्धक्यासाठी योग ” ही आहे. ही संकल्पना वैयक्तिक कल्याणावर लक्ष केंद्रित करून जगभरात आरोग्य, सलोखा आणि शांतता वाढवण्यासाठी, तसेच योगाचे सर्वांगीण फायदे लोकांपर्यंत पोहोचवून एक व्यापक चळवळ उभी करण्यावर भर देते.

भारतीय तटरक्षक हवाई केंद्र रत्नागिरीच्या धावपट्टी डीस्पर्सलवर २१ जून २०२६ रोजी पहाटे योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या योग सत्राची सुरुवात झाली. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात विविध आसने, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानधारणा या क्रियांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय, योगावर आधारित व्याख्यान आणि स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली. तटरक्षक वायू अवस्थानचे कमांडिंग ऑफिसर उपमहानिरीक्षक कुणाल नाईक यांनी या सत्राचे उद्घाटन केले.

Comments are closed.