Ratnagiri News – दापोलीच्या दाभोळ खाडीत केरळ स्टाईल हाऊसबोट सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील दाभोळ खाडीत केरळच्या धर्तीवर साकारलेली आकर्षक हाऊसबोट नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे दाभोळ खाडीतील पर्यटनाला नवी चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

ही हाऊसबोट विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे संचालन महिलांच्या हाती देण्यात आल्याने त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मदत होणार आहे.

दाभोळ खाडीचा निसर्गरम्य परिसर, शांत पाण्याचा विस्तार आणि हिरवळ यामुळे पर्यटकांना आकर्षित करणारे हे ठिकाण आता हाऊसबोटमुळे अधिक लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. पर्यटकांना जलपर्यटनासोबतच पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थांचाही आस्वाद येथे घेता येणार आहे. या उपक्रमामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळून दाभोळ खाडीचे महत्त्व आणखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments are closed.