Ratnagiri News – रुखी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पडलेले भगदाड ग्रामस्थांनी श्रमदान करत बुजवले; वाहतूक सुरळीत सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, यामुळे विविध भागांत आपत्तीजनक घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशीच एक घटना दापोलीतील रुखी गावाच्या हद्दीत घडली. मुसळधार पावसामुळे रुखी गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर अचानक एक मोठे भगदाड पडले. रस्त्यावरील या मोठ्या खड्ड्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण झाला होता, तसेच रुखी गावात जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

वाहतूक बंद पडल्यास ग्रामस्थांची गैरसोय होईल ही शक्यता लक्षात घेऊन, गावातील नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेतला. प्रशासनाची वाट न पाहता येथील ग्रामस्थांनी एकत्र येत स्वतःहून श्रमदान केले आणि रस्त्यावर पडलेले ते मोठे भगदाड सुरक्षितपणे बुजवून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. संकटसमयी एकजुटीने केलेल्या या महत्त्वपूर्ण सामाजिक कामाबद्दल आणि दाखवलेल्या तत्परतेबद्दल सध्या सर्व स्तरातून या ग्रामस्थांचे भरभरून कौतुक होत आहे.

Comments are closed.