Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; प्रवाशांचे प्रचंड हाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणाकडे रवाना झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा महापूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भरणे नाका ते वेरळ या दरम्यान आज (01 एप्रि ) भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, चाकरमान्यांना दोन ते तीन तास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे या कोंडीत अडकलेल्या लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून सर्वत्र संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

वाहतुकीचा हा खोळंबा लक्षात घेता स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाहनांची संख्या मर्यादेबाहेर गेल्याने पोलिसांना ही कोंडी सोडवताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि मनस्ताप टाळण्यासाठी प्रशासनाने वाहनधारकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. मार्गावरील अडथळा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी, अद्याप वाहनांचा वेग मंदावलेलाच आहे.

Comments are closed.