रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई, 55 गावातील 129 वाड्यामध्ये पाण्यासाठी वणवण
वाढत्या उकाड्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यात 55 गावातील 129 वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. जिल्ह्यातील 42 हजार 635 ग्रामस्थ शासनाच्या टॅंकरवर अवलंबून आहेत.
मंडणगड तालुक्यात 6 गावातील 6 वाड्यांमधील 5 हजार 265 ग्रामस्थांना 1 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.दापोली तालुक्यात 2 गावातील 7 वाडीतील 1 हजार 803 ग्रामस्थांना 1 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.खेड तालुक्यात 11 गावातील 21 वाड्यांमधील 1 हजार 416 ग्रामस्थांना 1 टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
गुहागर तालुक्यातील 1 गावातील 1 वाडीतील 1 हजार 07 ग्रामस्थांना 1 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पळूण तालुक्यात 10 गावातील 24 वाड्यांमध्ये 2 हजार 915 ग्रामस्थांना 1 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.संगमेश्वर तालुक्यात 15 गावातील 31 वाड्यांमध्ये 6 हजार 518 ग्रामस्थांना 2 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.रत्नागिरी तालुक्यात 10 गावातील 39 वाड्यातील 23 हजार 711!ग्रामस्थांना 10 टॅंकरनी पाणीपुरवठा सुरू आहे.
Comments are closed.