विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी ट
मुंबई: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका. विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी कान टोचल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळात गैरहजर राहणाऱ्या आमदार व मंत्र्यांच्या हातात रिपोर्ट कार्ड (Report Card) ठेवलं असल्याची देखील माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी सर्व आमदार व मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. यापुढे विधीमंडळात गैरहजर राहताना पक्षाला त्याचं लेखी कारण द्यावं लागणार आहे. नाहीतर संसदीय कामकाज मंत्री कार्यवाही करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार व मंत्री यांच्या विधीमंडळातील गैरहजेरीवरून रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे.
आमदारांवर भाजपची करडी नजर!
– सकाळी सभागृह सुरू झाल्यापासून सायंकाळी संपेपर्यंत सर्व आमदार व मंत्री यांना सभागृहात बसणं बंधनकारक असेल.
– पाच आमदारांचा एक गट तयार करून एका आमदाराकडे या गटाची जबाबदारी देण्यात आली आहे.
– संबंधित आमदार किती वेळ सभागृहातील कामकाजात सहभागी होतात? याचा रिपोर्ट गटाचा आमदार हा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे देईल.
– तर मंत्र्यांच्या कामकाजावर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वॉच असणार आहे.
– सभागृहात अनुपस्थित राहण्यासाठी कुठलीही बैठक किंवा तत्सम महत्त्वाचे काम असेल; तर संबंधित आमदार व मंत्र्याला तसे लेखी संयुक्तिक कारण हे पक्षाला कळवावे लागेल.
– कुठलीही सबब न देता अनुपस्थित राहणाऱ्या करतीलावर पक्ष, तर मंत्र्यांवर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील कार्यवाही करतील.
यापुढे अनुपस्थित राहण्यासाठी लेखी कारण देणे बंधनकारक
विधीमंडळातील गैरहजेरीवरून भाजप आमदार आणि मंत्र्यांवर पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. रविंद्र चव्हाण यांनी आमदारांना विरोधकांना कमी लेखू नका आणि सभागृहातील कामकाज गांभीर्याने घ्या, असा स्पष्ट इशारा दिल्याची माहिती आहे. सभागृहात वारंवार गैरहजर राहणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले असून, यापुढे अनुपस्थित राहण्यासाठी लेखी कारण देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
भाजपच्या नव्या नियमानुसार सकाळी सभागृह सुरू झाल्यापासून सायंकाळपर्यंत सर्व आमदारांनी उपस्थित राहणे आवश्यक असेल. पाच आमदारांचा एक गट तयार करून त्यातील एका आमदाराकडे उपस्थितीची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्र्यांच्या उपस्थितीवर चंद्रकांत पाटील लक्ष ठेवणार असून, विनाकारण गैरहजर राहणाऱ्यांवर पक्ष आणि संसदीय कामकाज विभागाकडून कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.