राजकीय वारसा कुटुंबातच ठेवण्यासाठी रवींद्र धंगेकर प्रयत्नशील; पुण्यात कार्यकर्त्यांचा संताप
Pune Election 2026 पुणे : भाजपसोबत युती झाली असली तरी जागा वाटपावरून घोडे अडल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसेनेचे महानगरप्रमुख रविन्द्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी वेळ प्रसंगी त्यांच्या मुलाला प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष लढवणार असे जाहीर केले आहे. दरम्यानभाजपवर दबाव टाकण्यासाठी धंगेकर यांनी हे विधान केले असले तरी पुन्हा मुलालाच उमेदवारी देऊन कुटुंबातच राजकीय वारसा निर्माण करण्यावरून धंगेकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. (Pune Election 2026)
दरम्यानशिवसेना, मनसे, काँग्रेस आणि आता शिवसेना शिंदे गटात असलेले धंगेकर हे चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. तर त्यांची बहिणही एकदा नगरसेवक राहिली आहे. धंगेकर यांनी तीन वेळा कसबा मतदारसंघातून विधानसभा लढवली आहे. एका पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून विजय होऊन आमदारही झालेत्यामुळे. यानंतर त्यांनी लोकसभा लढवली, मात्र पराभव झाला. या पाठोपाठ विधानसभेतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. (पुणे महानगरपालिका निवडणूक 2026)
Ravindra Dhangekar : राजकीय वारसा कुटुंबातच ठेवण्यासाठी प्रयत्नशील, कडवट सहकाऱ्यांची नाराजी घात्यामुळे करणार?
धंगेकर यांच्या सुमारे 35 वर्षांच्या निवडणुकांच्या काळात त्यांच्यासोबत राहिलेले बिनीचे कार्यकर्ते हे अद्यापही सोबत आहेत. परंतु नुकतेच लागलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये धंगेकर यांनी पत्नी आणि मुलाच्या उमेदवारीसाठी हट्ट धरल्याने या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उमेदीची तीस-पस्तीस वर्ष दिल्यानंतरही राजकीय वारसा कुटुंबातच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या धंगेकर यांना कडवट सहकाऱ्यांची नाराजी यंदा भारी पडू शकते, अशी चर्चा प्रभागात आहे.
Pune Bjp : भाजपाचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज आज होणार दाखल
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा अर्ज आज दाखल होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित राहणार आहेत.
Municipal Corporation Election 2026 : महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.