शिंदे गटाचा पुण्यातील प्रमुख चेहरा, तरीही रवींद्र धंगेकरांना बैठकीला बोलावलं नाही, मुरलीधर मोहो

रवींद्र धंगेकर: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे (Municipal Election 2026) बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) दृष्टीनेही घडामोडी महत्त्वाच्या ठरत असून महायुतीतील (Mahayuti) अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुती म्हणून लढवली जाणार आहे. या संदर्भात आज पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि शहराध्यक्ष गणेश बिडकर उपस्थित राहणार आहेत. तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत, उपनेत्या निलम गोऱ्हे, माजी आमदार विजय शिवतारे आणि संपर्कप्रमुख नाना भानगीरे सहभागी होणार आहेत.

Ravindra Dhangekar: महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना डावलले

मात्र या बैठकीतून शिंदे गटाचे पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेत्यांच्या विरोधामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना निर्णय प्रक्रियेतून डावलण्यात आले. विशेष म्हणजे धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) पुणे महापालिकेतील सर्व 165 जागा लढवण्याची तयारी करत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता त्या़ंच्याच पक्षाच्या नेत्यांकडून आज भाजपला युतीत 35 ते 40 जागा मिळाव्यात यासाठी प्रस्ताव देण्यात येणार आहे. तर, पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता हेच प्रकरण रवींद्र धंगेकर यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ravindra Dhangekar: काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

दरम्यान, याबाबत रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला असता बैठकीबाबत मला काहीही कळाले नाही. तुमच्या मार्फत याबाबत कळलंय. दिवसभरात निमंत्रण येईल.  आज मी शिवसेनेच्या मुलाखती घेणार आहे ते  संपवून काय आहे ते कळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Pimpri Chinchwad: पिंपरी पालिकेत घराणेशाही, विधानसभा उपाध्यक्ष मुलाच्या जागेसाठी थेट ‘अतिक्रमण’ करणार!

दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडेंचा मुलगा सिध्दार्थ यंदा नशीब अजमावणार आहे. मात्र मुलाचा बाल हट्ट पुरवण्यासाठी बनसोडेंना एखाद्या जागेवर अतिक्रमण करावं लागणार आहे. कारण पिंपरी चिंचवड शहरात स्वतः राहत असलेल्या प्रभागातील जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळं इतर प्रभागातील अनुसूचित जाती खुल्या गटातील जागेवर त्यांना अतिक्रमण करावं लागणार आहे. अण्णा बनसोडेंना याबाबत विचारलं असता सिद्धार्थ शंभर टक्के निवडणूक लढणार हे त्यांनी ठामपणे सांगितलं. मात्र कोणत्या प्रभागातून याबाबत त्यांनी खुलासा केला नाही. खराळवाडी, पिंपरी, आनंदनगर अशा पाच ते सहा प्रभागातील एका जागेवर तो लढू शकतो. असं बनसोडे म्हणतात. म्हणजे मुलगा सिद्धार्थ ज्या जागेसाठी बाल हट्ट करेल, त्या जागेवर अतिक्रमण करण्याची बनसोडे यांनी तयारी केलीये. विधानसभा उपाध्यक्ष पद स्वतःकडे असल्यानं ते आता कोणत्या इच्छुकावर दबाव टाकणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यानिमित्ताने घराणेशाहीचा मुद्दा ही पिंपरी चिंचवड शहरात चर्चेत आहे.

आणखी वाचा

Manikrao Kokate Arrest: माणिकराव कोकाटेचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत येणार, कोर्टाच्या निर्णयापूर्वीच अटक?

आणखी वाचा

Comments are closed.