भाजपश्रेष्ठींनी मुरलीधर मोहोळांची कानउघडणी केल्याने जैनमुनींच्या पायावर नतमस्तक झाले: रवींद्र ध


मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंग हाऊस पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनी आरोपांची सरबत्ती सुरुच ठेवली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीनविक्रीच्या (Jain Boarding house Lande) वादाचे प्रकरण 1 तारखेच्या आधी मिटवू, असे आश्वासन दिले होते. त्यासाठी मुरलीधर मोहोळ हे शनिवारी जैन बोर्डिंग हाऊसमध्ये विश्वस्तांना भेटायला गेले होते. त्यावेळी मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता. जैन बांधवांनी त्यांच्याविरोधात घोषणबाजी केली होती. एका महिलेने मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना आक्रमकपणे जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ यांनी या जैन बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून मुरलीधर मोहोळ यांनी तिथून काढता पाय घेतला होता. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन मुरलीधर मोहोळ यांना डिवचले. (Pune News)

“एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा” अशी कानउघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहोळ आज तातडीने जैन मुनींच्या पायी नतमस्तक झाले. तब्बल 18 दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली. मुळात कुंपणाने शेत खाल्ल्यामुळे न्यायनिवडा कोणी करायचा…? हा प्रश्न आहे. स्वतःच्याच कंपनीला फायदा होईल यासाठी ही जागा घेतल्याने आता कुठल्या तोंडाने मी व्यवहार रद्द करतो, असं सांगू अशी अवस्था त्यांची झालेली आहे. परमेश्वर मोहोळांना सद्बुद्धी देवो…. जैन मंदिराची बळकवलेली जागा ते लवकरात लवकर परत करो….!, असे रवींद्र धंगेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

या सगळ्या प्रकारानंतर मुरलीधर मोहोळ यांनी घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले होते, असे म्हटले.जैन मुनींनी मला आवाहन केलं होतं की, तुम्ही पुण्याचे खासदार आहात या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या सहभागी व्हा. यातून मार्ग काढून द्या, असं जैन मुनी यांनी मला आवाहन केलं होतं. माझा सहभाग असता तर त्या लोकांनी मला बोलवलं नसतं, असे मोहोळ म्हणाले. मी त्यांना शब्द दिला आहे की पुढच्या काही दिवसात मी यातून मार्ग काढून देईल. मी सगळ्यांशी बोलीन, ज्यांनी व्यवहार केला किंवा जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी बोलून मार्ग काढू असेही मोहोळ म्हणाले. ज्या लोकांनी घोषणाबाजी केली ती दोन लोक कुणीतरी सोडलेलीच होती. त्या लोकांनी तिथेही राजकारण केल्याचे मोहोळ म्हणाले.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहले आहे. जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही मी निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही.त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी पत्रात म्हटले होते.

Murlidhar Mohol: आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही: मुरलीधर मोहोळ

जैन बोर्डिंग हाऊस जमीनविक्री प्रकरणात राजू शेट्टी आणि रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विकत घेणारे गोखले बिल्डर्स हे मुरलीधर मोहोळ यांचे भागीदार असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. यावर मोहोळ यांनी स्पष्टीकरणही दिले होते. जे आरोप करतात त्यांचा विषयी मी आता सोडून दिला आहे. काही विषय सोडून दिल्याने सुटत असतात असे मोहोळ यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, ‘त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय’

आणखी वाचा

Comments are closed.