गुजरातच्या शिक्षणमंत्री कोण आहेत? ज्यांना जडेजाने समर्पित केला सामनावीर पुरस्कार…
राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 40 धावांनी दमदार विजय मिळवत आयपीएल सामन्यात खळबळ उडवली. या विजयाचा खरा शिल्पकार अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा ठरला. जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये शानदार कामगिरी करत सामन्यावर आपली छाप उमटवली आणि सामन्यानंतरच्या वक्तव्याने तसेच एका खास समर्पणाने चाहत्यांची मनं जिंकली.
या हंगामात जडेजा राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत खेळताना दिसत आहे. काही सामन्यांमध्ये त्याला त्याच्या कोट्यातील पूर्ण 4 षटके न दिल्याचेही दिसून आले, मात्र त्याने याला कोणतीही नाराजी न दाखवता संघहिताला प्राधान्य दिले आहे.
जियोहॉटस्टारशी बोलताना जडेजा म्हणाला की, “मी मैदानात येण्यापूर्वी माझा अहंकार हॉटेलच्या खोलीतच ठेवतो. माझ्यासाठी वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाची गरज जास्त महत्त्वाची आहे.” हीच परिपक्वता त्याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह खेळाडूंमध्ये स्थान मिळवून देते.
लखनऊच्या एकाना स्टेडियमवरील संथ खेळपट्टीवर जडेजाने 29 चेंडूत 43 धावांची संयमी खेळी केली. त्याच्या मते, शेवटपर्यंत टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण मधल्या फळीत लवकर बाद झाल्यास संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नसता.
गोलंदाजीतही त्याने हुशारी दाखवत दिग्वेश राठीच्या चेंडूंचा अभ्यास करून वेग कमी केला. त्यामुळे 4 षटकांत फक्त 29 धावा देत 1 बळी घेतला आणि फलंदाजांना अडचणीत टाकले.
सामन्यानंतर ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्वीकारताना जडेजाने हा सन्मान पत्नी रिवाबा जडेजाला समर्पित केला. त्याने रिवाबाला “गुजरातच्या शिक्षण मंत्री” असे संबोधत तिच्या भविष्यवाणीचा उल्लेख केला की, रिवाबाने सामन्यापूर्वीच जडेजा उत्कृष्ट खेळ करेल असे सांगितले होते. ही भविष्यवाणी खरी ठरली.
रिवाबा जडेजा सध्या गुजरात सरकारमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि प्रौढ शिक्षण राज्यमंत्री असून जामनगर उत्तर मतदारसंघाच्या आमदार आहेत.
Comments are closed.