वानखेडेवर विचित्र ड्रामा! टिम डेव्हिडच्या त्या एका कृतीने अंपायर संतापले; नेमकं काय घडलं?
IPL 2026 MI vs RCB टिम डेव्हिड अंपायरसह : आयपीएल 2026 च्या हाय-स्कोअरिंग सामन्यात मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 18 धावांनी विजय मिळवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 4 गडी गमावून 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने 5 गडी गमावून 222 धावा केल्या. मात्र, या सामन्यात एक मजेशीर घटना घडली, ज्याने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. आरसीबीचा स्टार ऑलराउंडर टिम डेव्हिड आपल्या एका खोडकर कृतीमुळे चर्चेत आला. त्याच्या या प्रकारामुळे मैदानावरील अंपायर चिडले, तर माजी कर्णधार रोहित शर्मा हसू आवरू शकले नाहीत.
नेमकं काय घडलं?
ही घटना आरसीबीच्या डावातील 18व्या षटकात घडली. हार्दिक पांड्या यांच्या चेंडूवर टिम डेव्हिडने मोठा षटकार ठोकला. इतका जोरदार फटका होता की चेंडूचा आकारच बदलला आणि तो ओलाही झाला. त्यामुळे अंपायरांना चेंडू बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. नवीन चेंडूंचा बॉक्स मैदानावर आल्यानंतर टिम डेव्हिडने एक चेंडू उचलला आणि त्याच्याशी खेळू लागला. अंपायर वारंवार चेंडू मागत होते, पण टिम डेव्हिड मस्ती करत तो परत देत नव्हता. त्यामुळे अंपायर थोडे चिडलेले दिसले. काही वेळाने मात्र टिम डेव्हिडने चेंडू परत केला आणि वातावरण पुन्हा हलकंफुलकं झालं. या सगळ्या प्रकारात रोहित शर्मा टिम डेव्हिडसोबत हसत-खेळत मजा घेताना दिसले.
संपूर्ण विनाशानंतर टिम डेव्हिडकडून प्रासंगिक तपासणी 🔥🥶#IPLRivalryWeek 2026 👉 #MIvRCB | आता थेट 👉https://t.co/gLbf9ggQbu | #TATAIPL pic.twitter.com/OumaLMDlYF
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 12 एप्रिल 2026
आरसीबीच्या फलंदाजांचा मैदानावर तांडव
सामन्यात आरसीबीच्या टॉप ऑर्डरने वानखेडेवर अक्षरशः धुमाकूळ घातला. फिल सॉल्ट याने 36 चेंडूत 78 धावांची तुफानी खेळी केली. विराट कोहली याने 38 चेंडूत 50 धावा करत एक बाजू भक्कम ठेवली. दोघांनी मिळून 120 धावांची जबरदस्त सलामी भागीदारी उभी केली. यानंतर कर्णधार रजत पाटीदार याने अवघ्या 20 चेंडूत 53 धावा करत मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दमदार फलंदाजीच्या जोरावर RCB ने 4 गडी गमावून तब्बल 240 धावांचा डोंगर उभारला.
मुंबईचा पराभव
241 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने चांगला प्रयत्न केला, पण 20 षटकांत 5 गडी गमावून 222 धावांपर्यंतच मजल मारली. आरसीबीने हा सामना 18 धावांनी जिंकत आपली दमदार कामगिरी कायम ठेवली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.